छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर शहरातील टीव्ही सेंटर जिल्हाधिकारी रोडवर असलेल्या हिंगलाज माता मंदिरामध्ये रात्रीच्या सुमारास चोरीची घटना घडली आहे. मंदिरामध्ये रात्री तीन वाजेच्या सुमारास चोरी झाल्याची घटना घडली आहे. पाच ग्रॅम सोनं मंगळसूत्र मनी, कंबरपट्टा जोडवे, त्रिशूल, भाला, तलवार, गदा, चक्र या वस्तू चोरीला गेल्या असून दान पेटीतील पैसे देखील गेले आहेत. याविषयी मंदिराचे ट्रस्टी सचिन बोंबले यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे. (Theft News)
Theft News : हिंगलाज माता मंदिरामध्ये चोरी; दागिन्यांसह दानपेटीतील पैसेही गायब!
