नवीन सरकार काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष
मालेगाव : मालेगाव शहरातील (Malegaon News) संगमेश्वर शिवारातील सर्व्हे नंबर ११४ अ मधील शेतीचा प्लॉट सांगून भूमाफीया आरीफ अब्दुल लतीफ व इतर भूमाफियांनी सरकारी अधिका-यांशी संगनमत करून सदर शेतीच्या उताऱ्यावर इतर हक्कात सदरच्या जमीनीचा बिनशेती वापर करावयाचा असल्यास बाजार भावाप्रमाणे ५० टक्के नजराणा भरावा लागेल असा स्पष्ट उल्लेख अद्याप इतर हक्कात कायम असताना सदर जमीन बिनशेती वापरासाठी असल्याचे सांगून हजारो गरीब जनतेला खरेदी देऊन करोडो रूपयांचा शासनाचा महसूल व स्टॅम्प ड्यूटी (Stamp Duty) बुडवून गरीब जनतेची फसवणूक (Fraud) केली आहे असे माहितीच्या आधारे समोर आले आहे.
Mumbai Fire : डोंगरीतील रहिवाशी इमारतीला भीषण आग; परिसरात धुराचे मोठे लोट!
सदर जमीन शेती उपयोगासाठी असताना जमीन अकृषिक कारणासाठी असून तीचे टायटल क्लिअर असल्याचे खरेदीदारांना विश्वास देऊन सदर जमानीची सौदा पावती करून देण्यात आली. सदर जमीन बीनशेती करून देऊन सदर जागेवर रोड, गटार व इलेक्ट्रीक पोल लावून देण्याचे आश्वासन गरीब खरेदीदारांना दिले गेले. मात्र आज रोजी तिथे काहीही सुविधा देण्यात आलेली नाही. जमीनीची खरेदी देताना सदर भूमाफीयाने चलाखी करत शेतीची खरेदी सरकारी किंमतीपेक्षा कमी किंमतीत सदर शेती खरेदी करून दिली. सदर जमीन नवीन व अविभाज्यीय शर्तीची जमीन असल्यामुळे सदर जमीनीचा नजराणा देखील भरणे अत्यावश्यक होते. मात्र सरकारच्या डोळ्यात धुळ टाकण्यासाठी या जमीनीची खरेदी करण्यासाठी या भूमाफिया गॅंगने टेक्नीकल शब्दाचा वापर करताना या शेतीची खरेदी ‘बैल गोठ्यासाठी’ सांगून पुर्ण चार हेक्टर पंचावन्न आर जमीनीची खरेदी ‘बैल गोठ्यासाठी’ हे कारण दाखवून करून घेतली. मात्र आज सद्यस्थितीत सदर जागेवर एकही ‘बैल गोठा’ दिसून येत नाही.
सदर जमीन फक्त कृषिक वापरासाठी असलेल्या या जागेवर आज रोजी तुकडे बंदी कायद्याचा अवमान करून शेकडो घरांचे बांधकाम, कारखाने निर्माण झाले आहेत. सदर अवैधरीत्या खरेदी विक्री झालेल्या ११४ अ संगमेश्वर या जमीनीची अपर जिल्हाधिकारी यांचे कोर्टात झालेल्या आरटीएस पुननिरीक्षण अपील सुनावणी झाली असता अपर जिल्हाधिकारी यांनी सदर शेतीच्या अवैध रीत्या झालेल्या खरेदीचे नोंद क्रमांक २७१८० ही फेरफार नोंद रद्द करण्यात यावी व मुळ मालकाचे नाव लावावे असे स्पष्ट आदेश देण्यात आले असून सुद्धा अद्याप सदर निर्णयाची अंमलबजावणी करण्यात आलेली नाही. भूमाफीया आरीफ अब्दुल लतीफ व इतर भूमाफीया गरीब जनतेची कोट्यावधी रूपयांची फसवणूक करून व शासनाचा शेकडो कोटींचा नजराणा महसूल व स्टॅम्प बुडवून शहरात मोकाट फिरत आहेत. सदरहू भू माफीयाने मालेगाव शहरातील अशा अनेक जमीनींची खरेदी विक्री केली असून सर्व्हे नंबर ९८ मालेगाव शिवार महानगरपालिका हद्दीतील प्राथमिक शाळेसाठी आरक्षीत असलेल्या जमीनीची बेकायदेशीर खरेदी घेऊन तुकडेबंदी नियम धाब्यावर ठेवून जमीनीचे तुकडे पाडून प्लॅाट खरेदी विक्री करून गरीब जनतेची व शासनाचा शेकडो कोट्यावधी रूपयांचा अपहार केला आहे.
याच प्रकारे सदर भूमाफीयाने सर्व्हे नंबर ११४ ब या जमीनीचा देखील अकृषिक आदेश नसताना तुकडे बंदी कायद्याचा अवमान करून तुकडे पाडून गरीब जनतेला अकृषिक निवासी जागा असल्याचे भासवून खरेदी विक्री करून गरीब जनतेची फसवणूक केली आहे व यात देखील शासनाचा कोट्यावधी रूपयांचा महसूल बुडवला आहे.
अशा प्रकारे व्यवसायाने स्टॅम्प वेंडर असलेल्या सदर व्यक्तीने मालेगांवातील अनेक भूमाफीयांशी हात मिळवणी करून मालेगाव शहराची धारावी करत असून सदर भूमाफीयाने अशा अनेक बेकायदेशीररीत्या जमीनींची खरेदी विक्री करून बेकायदेशीर मोठमोठ्या इमारतींचे बांधकाम करून बेकायदेशीररीत्या फ्लॅटची खरेदी विक्री केली आहे. गरीब जनतेची फसवणूक करून शासनाचा शेकडो कोट्यावधी रूपयांचा नजराणा तसेच स्टॅम्प ड्यूटी महसूल बुडवला आहे व हजारो कोटींची अवैधरीत्या मालमत्ता कमावली आहे.
तरी स्थानिक जनतेकडून या विरूद्ध आक्रोश झाल्यामुळे सदर भूमाफियांविरूद्ध कठोर कार्यवाहीची मागणी स्थानिक फसवणूक झालेल्या लोकांकडून होत आहे. सदर प्रकरणात नवीन शासन काय कारवाई करेल याकडे जनसामान्यांचे लक्ष लागले आहे.