मुंबई: वास्तुशास्त्रानुसार घरात काही झाडे लावणे फायदेशीर असते. घरात यामुळे आनंद राहतो. वास्तुशास्त्रानुसार घरात कोरफडीचे झाड लावणे अतिशय शुभ असते.
वास्तुशास्त्रात असे म्हटले आहे ही हे झाड लावल्याने आर्थिक तंगी दूर होते. बिघडलेली कामे पूर्ण होतात. घरात कोरफडीचे झाड लावल्याने प्रेम, प्रगती, धन आणि प्रतिष्ठा यांच्यात वाढ होते.
दरम्यान, हे चमत्कारी झाड लावण्याआधी कोणत्या दिशेला ते लावावे हे पाहणे अधिक गरजेचे असते. वास्तुशास्त्रानुसार जर घरात सुख-शांतीचा वास हवा असेल तर पूर्व दिशेला कोरफडीचे झाड लावावे.
तसेच जर तुम्ही घराच्या दक्षिण-पूर्व कोपऱ्यात कोरफडीचे झाड लावत असाल तर तेही शुभ मानले गेले आहे. वास्तुशास्त्रानुसार जर तुम्हाला घरात प्रगती हवी असेल तर घराच्या पश्चिम दिशेला हे झाड लावणे उत्तम मानले जाते. वास्तुशास्त्रानुसार कोरफडीचे झाड कधीही उत्तर-पश्चिम कोपऱ्यात असता कामा नये.