Saturday, February 8, 2025
Homeक्रीडाICC test Rankings: अव्वल स्थानाजवळ पोहोचला यशस्वी जायसवाल

ICC test Rankings: अव्वल स्थानाजवळ पोहोचला यशस्वी जायसवाल

मुंबई: आयसीसी(ICC) द्वारे जाहीर करण्यात आलेल्या रँकिंगमध्ये भारताचा फलंदाज यशस्वी जायसवालला(yashaswi jaiswal) जबरदस्त फायदा मिळाला आहे. बॉर्डर गावस्कर ट्रॉफी २०२४मधील पहिल्या कसोटीत शानदार १६१ धावांची खेळी करण्याचा फायदा जायसवालला मिळाला आहे. आता तो कसोटी फलंदाजांच्या रँकिंगमध्ये दुसऱ्या स्थानावर आहे. त्याला भले प्लेयर ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळआला नसला तरी त्याने टीम इंडियाच्या विजयात मोलाचे योगदान दिले.

यशस्वी जायसवालचे रेटिंग ८२५ झाले आहे. मात्र कसोटी फलंदाजींच्या रँकिंगमध्ये इंग्लंडचा ज्यो रूटने दबदबा बनवला आहे. जायसवालने दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. मात्र रेटिंगच्या बाबतीत तो अद्याप रूटपेक्षा मागे आहे. पर्थ कसोटीबाबत बोलायचे झाल्यास जायसवालला पहिल्या डावात मिचेल स्टार्कने शून्यावर बाद केले होते. मात्र दुसऱ्या डावात त्याने १६१ धावांची खेळी केली. सोबत केएल राहुलसोबत भागीदारी करताना २०१ धावा केल्या.

विराट कोहलीलाही बंपर फायदा

एकीकडे यशस्वी जायसवालला शतकी खेळीचा फायदा मिळाला आहे. यानंतर तो फलंदाजांच्या रँकिंगमध्ये दुसऱ्या स्थानावर आला आहे. टॉप १० मध्ये ऋषभ पंतचाही समावेश आहे. तो आधी प्रमाणेच सहाव्या स्थानावर कायम आहे. पर्थ कसोटीत पंतने पहिल्या आणि दुसऱ्या डावात अनुक्रमे १ आणि ३७ धावांची खेळी केली होती. त्यानंतर नंबर येतो तो विराट कोहलीचा. पआर्थ कसोटीच्या आधी तो टॉप २०मध्ये सामील नव्हता. मात्र कसोटी क्रिकेटमधील ३०व्या शतकामुळे त्याला रँकिंगमध्ये ९व्या स्थानांचा फायदा आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -