मुंबई: बदाम आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर सुकामेवा आहे. आजही लोक चांगल्या आरोग्यासाठी काजू बदाम खाण्याचा सल्ला देतात. आधी काजू-बदाम खाणे लोकांना परवडत नव्हते. मात्र आता मध्यमवर्गातील लोकांमध्येही ड्रायफ्रुट्स खाण्याची चलती वाढली आहे. मात्र ड्रायफ्रुट्स हे मर्यादित प्रमाणात खावेत. यामुळे शरीरास नुकसानही होत नाहीत.
जर तुम्हाला कसली अॅलर्जी आहे तर कोणत्याही प्रकारचे नट्सचे सेवन सावधतेने केले पाहिजे. ज्या लोकांना अक्रोडची अॅलर्जी आहे त्यांनी बदामही खाऊ नये. जे लोक जास्त प्रमाणात बदाम खातात त्यांचे वजन कमी होण्याऐवजी वाढू शकते.
Health: डाएटमध्ये सामील करा या गोष्टी, कमी होईल कॅन्सरचा धोका
बदामामध्ये फायबरचे प्रमाण अधिक असते. यामुळे आतड्यांचे आरोग्य चांगले राहते. मात्र अधिक बदाम खाल्ल्यास त्रास होऊ शकते. बदामाचे अधिक सेवन बद्धकोष्ठतेला कारणीभूत ठरू शकते.
जर तुम्हाला किडनी स्टोनचा त्रास आहे तर बदाम खाऊ नयेत. बदामामध्ये ऑक्सालेट मोठ्या प्रमाणात असते. यामुळे किडनी स्टोनचा धोका वाढतो.
ज्या लोकांना अॅसिड रिफ्लक्सचा त्रास आहे त्यांनी बदामाचे सेवन कमी प्रमाणात केले पाहिजे. अधिक बदाम खाल्ल्याने छातीत जळजळ आणि गॅस तसेच अॅसिडिटीची समस्या होऊ शकते.
बदामामध्ये व्हिटामिन ई मोठ्या प्रमाणात असते. व्हिटामिन ई रक्त जमा होण्यापासून रोखतात. यामुळे रक्ताच्या गाठी होत नाहीत.
एका दिवसांत किती बदाम खाल्ले पाहिजे?
निरोगी राहण्यासाठी एका दिवसांत ५ ते ६ बदाम खाल्ले पाहिजेत. जे मोठ्या प्रमाणात वर्क आऊट करता ते ८ ते १० बदाम खाऊ शकतात. बदाम नेहमी पाण्यात भिजवून खाल्ले पाहिजेत. सकाळी रिकाम्या पोटी बदाम खाणे फायदेशीर असते.