Friday, May 9, 2025

महाराष्ट्रताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूज

Railway Updates: मुंबई-लातूर आणि बीदर एक्स्प्रेस डिसेंबरपासून कायमस्वरूपी

Railway Updates: मुंबई-लातूर आणि बीदर एक्स्प्रेस डिसेंबरपासून कायमस्वरूपी

मुंबई : रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी (Railway Updates) मुंबई-लातूर (Mumbai-Latur) आणि मुंबई-बीदर (Bidar Express) या दोन गाड्यांचा विस्तार डिसेंबर महिन्यापासून कायमस्वरूपी करण्याचे ठरविले आहेत. डिसेंबर महिन्यापासून या दोन्ही गाड्या अतिरिक्त डब्यांसह चालणार आहेत.


सोलापूर विभागातून जाणाऱ्या मुंबई-लातूर व मुंबई- बीदर या दोन एक्स्प्रेसचा कायमस्वरूपी विस्तार करण्यात येणार आहे. ट्रेन क्रमांक २२१०७/२२१०८ आणि २२१४३/२२१४४ यामध्ये कायमस्वरूपी तीन अतिरिक्त डब्यांसह चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या गाड्यांना दोन अतिरिक्त तृतीय वातानुकूलित कोच आणि एक अतिरिक्त द्वितीय वातानुकूलित कोच जोडण्यात येणार आहेत.


/>

ट्रेन क्रमांक २२१०७/२२१०८ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई - लातूर एक्स्प्रेस : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून ता. १ डिसेंबरपासून आणि लातूर येथून ता. २ डिसेंबरपासून २ अतिरिक्त तृतीय वातानुकूलित कोच आणि १ अतिरिक्त द्वितीय वातानुकूलित कोच


ट्रेन क्रमांक २२१४३/२२१४४ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई - बीदर एक्स्प्रेस : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून ता. ४ डिसेंबरपासून आणि बीदर येथून ता. ५ पासून २ अतिरिक्त तृतीय वातानुकूलित कोच आणि १ अतिरिक्त द्वितीय वातानुकूलित कोच.

Comments
Add Comment