Monday, February 17, 2025
Homeताज्या घडामोडीNagraj Manjule: 'खाशाबा जाधव' चित्रपट वादाच्या भोवऱ्यात; नागराज मंजुळे यांना समन्स

Nagraj Manjule: ‘खाशाबा जाधव’ चित्रपट वादाच्या भोवऱ्यात; नागराज मंजुळे यांना समन्स

पुणे: दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी घोषित केलेल्या खाशाबा जाधव यांच्या चित्रपटातील कथा वादाच्या भोवर्‍यात सापडली आहे. मूळ कथा लेखक संजय दुधाणे यांची असून त्यांनी कॉपीराईटबाबत दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्यासह जिओ स्टुडियो, आटपाट प्रोडक्शन, निर्माती ज्योती देशपांडे यांच्या विरोधात पुणे जिल्हा व सत्र न्यायालयात दावा दाखल केला आहे. याबाबत न्यायालयाने दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्यासह सर्वांना समन्स पाठवले आहे.

नागराज मंजुळे यांच्या आटपाट प्रोडक्शनच्या स्टुडिओत झालेल्या बैठकीतील कराराबाबत नागराज मंजुळे व रणजीत जाधव यांनी उदासीनता दाखविल्याने दुधाणे यांनी नागराज मुंजुळे व जिओ स्टेडिओला कायदेशीर नोटिस पाठवली. यानंतर एका बड्या मध्यस्थीदारामार्फत नागराज मंजुळे यांचे वकील अ‍ॅड. रामकृष्ण कुलकर्णी यांनी सप्टेंबर २०२४ मध्ये २ वेळा प्रत्यक्ष भेटून समझोता करार लिहून आणला होता. ३ लाख रूपये देऊन पुस्तकाचे सर्व हक्क व चित्रपटाला ना हरकत देत आहेत. असे करारात लिहले होते. लेखक संजय दुधाणे यांच्या पुस्तकाचे सर्व हक्क रणजीत जाधव यांना द्यावे असा करारात अट होती. ही अट मान्य नसल्याने अखेर संजय दुधाणे यांनी पुणे सत्र न्यायालयात धाव घेतली.

Pinga G Pori Pinga: प्रत्येक महिलेच्या मनाचा आरसा दाखवणारी ‘पिंगा गं पोरी पिंगा’

संजय दुधाणे लिखित ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव हे खाशाबांवरील पहिलेच व एकमेव पुस्तक आहे. यासाठी खाशाबांच्या काळातील कुस्तीगीरांची भेट घेऊन परिपूर्ण माहिती एकत्रित केली होती. दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या हस्ते २००१ मध्ये या पुस्तकाचे प्रकाशन झाले होते. ऑलिंपिकवीर खाशाबा जाधव या पुस्तकाची विक्रमी १५ वी आवृत्ती प्रकाशित झाली असून, या पुस्तकाला २००८ मध्ये सर्वोत्कृष्ठ क्रीडा पुस्तकाचा राज्यपुरस्कारही मिळाला आहे. २००४ मध्ये इयत्ता ९ वी व २०१५ मध्ये इयत्ता ६ वीच्या पाठ्यपुस्तकात या पुस्तकातील पाठ समाविष्ट करण्यात आला आहे. याच पुस्तकाच्या आधारे तेजपाल वाघ यांनी चित्रपटाची पटकथा लिहिली होतीे. त्यांनी पटकथा व संशोधन सर्व नागराज मंजुळे यांच्याकडे सुपूर्त केले होते. असे असताना संजय दुधाणे यांना अंधारात ठेवून मंजुळे चित्रपट निर्मिती करीत असल्याने हा वाद न्यायालयाच्या दारात पोहचला आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -