Monday, February 17, 2025
Homeमहाराष्ट्रठाणेKDMC : कल्याणमध्ये गगनचुंबी इमारतीत अग्नितांडव; केडीएमसीची अग्निशमन यंत्रणा ठरली कुचकामी

KDMC : कल्याणमध्ये गगनचुंबी इमारतीत अग्नितांडव; केडीएमसीची अग्निशमन यंत्रणा ठरली कुचकामी

५० मीटरची शिडी बंद असल्याने आग विझविण्यासाठी करावी लागली कसरत

कल्याण : कल्याण पश्चिमेतील (KDMC) व्हर्टेक्स या नामकिंत गगनचुंबी हाय फोफ्राईल सोसयटीतील इमारती मधील १५ व्या मजल्यावरील संतोष शेट्टी यांच्या सदनिकेला आग लागल्याची घटना मंगळवारी सांयकाळी साडेपाचच्या सुमारास घडली. सुदैवाने यात जिवित हानी झाली नाही.

अचनाक लागल्याने या आगीने जाळासह धुराचे लोट उठले या धुराचे लोट लांब पर्यंत दिसत होते. परंतु वेळेत आगीवर नियंत्रण न झाल्याने १५ व्या मजल्यावरील आगीचे लोट हवेमुळे १६ व्या आणि १७व्या मजल्या पर्यंत पोहचल्याने या आगीत तीन मजल्यावरील सदनिका जळून खाक झाल्या.

उंच इमारतीमधील आग विझविण्यासाठी केडीएमसीच्या वतीने ५५ मीटर लांबीची शिडी असलेली अद्यावत गाडी घेण्यात आली होती, मात्र ही गाडी बंद असल्याने आग विझविण्यासाठी अग्निशमन विभागला मोठी कसरत करावी लागली.

याठिकाणी उशिराने अग्निशमन दलाच्या गाड्या आल्याचा आरोप येथील नागरिकांनी केला आहे. यामुळे केडीएमसीची अग्निशमन यंत्रणा कुचकामी ठरली असल्याचे दिसून आले. कल्याण डोंबिवली मनपा आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांनी घटनास्थळी पोहचत परिस्थिती ची माहिती घेतली. तसेच ५५ मीटर शिडी असलेली अग्निशमन गाडी तांत्रिक बिघाडामुळे कार्यान्वित नव्हती त्यामुळे ठाणे मनपा कडून गँल्डर अग्निशमन गाडी पाचरण करण्यात आली. पोलीस प्रशासन आणि आम्ही परिस्थिती वर लक्ष ठेऊन आहोत. इमारतीतील रहिवाशांना सुखरूपपणे बाहेर काढलं असल्याचे आयुक्तांनी सांगितले. याआगीच्या घटनास्थळी मनपा आधिकारी कर्मचारी असा मोठा फौज फाटा उपस्थित होता. आगीवर नियंत्रण आण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवांनानी तब्बल ३ तासानंतर आग विझविण्यात यश आले. त्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी कुलिंग अँपरेशन सुरु केले. अशी माहिती सूत्रांकडून मिळाली. यानिमित्ताने कल्याण डोंबिवली मनपा क्षेत्रातील (KDMC) इमारती मधील फायर फायटिंग यंत्रणा प्रश्न ऐरणीवर आला असून प्रशासनाने आता डोळस भुमिका घेत अति जुन्या उच्च इमारतीमधील फायर फायटिंग यंत्रणा अपडेट कशी होईल याबाबत अमंलबजावणी केली पाहिजे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -