Chinchpokli Accident : ट्रकच्या चाकाखाली येऊन डिलिव्हरी बॉयचा मृत्यू, मुंबईतील चिंचपोकळी येथील घटना

मुंबई : चिंचपोकळी रेल्वे स्थानकाजवळील संत ज्ञानेश्वर पुलावर ट्रकच्या चाकाखाली येऊन डिलिव्हरी बॉयचा मृत्यू झाला. ही घटना (Chinchpokli Accident) सोमवारी (२५ नोव्हेंबर) दुपारी २.१५ च्या सुमारास घडली. याप्रकरणी काळाचौकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


शंकरप्पा असे मृत्यू झालेल्या डिलिव्हरी बॉयचे नाव असून तो धारावी येथील रहिवासी आहे. शंकरप्पा हा इडलीची डिलिव्हरी देण्यासाठी ॲक्टिव्हा स्कूटरवरून चिंचपोकळी पुलावरून लालबागच्या दिशेने जात एका वळणावर त्याचा तोल गेला आणि ट्रकच्या मागच्या चाकाखाली येऊन त्याचा मृत्यू झाला.



या घटनेनंतर ट्रक चालकाने मदत करण्याऐवजी घटनास्थळावरून पळ काढला. त्यानंतर रात्री उशीरा त्याने स्वत:ला काळाचौकी पोलिसांच्या स्वाधीन केले.


मिळालेल्या माहितीनुसार, धम्म प्रसाद (वय, ५०) असे अटक झालेल्या ट्रकचालकाचे नाव आहे. प्रसाद हा मूळचा उत्तर प्रदेशचा असून गेल्या ३५ वर्षांपासून मुंबईत काम करतो. अपघाताच्या वेळी (Chinchpokli Accident) तो रिकामा ट्रक दारूखान्याच्या दिशेने चालवत होता. या घटनेचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Comments
Add Comment

Weastern Railway : पश्चिम रेल्वेकडून मान्सूनपूर्व कामे पूर्ण

मुंबई : पश्चिम रेल्वेने आगामी मान्सूनच्या पार्श्वभूमीवर मुंबई उपनगरीय रेल्वे सेवेसाठी व्यापक तयारी पूर्ण केली

अपघातग्रस्त कामगारांच्याबाबत प्रत्यारोपण शस्त्रक्रियांच्या तातडीसाठी उपाययोजना करा; कामगार मंत्री ॲड आकाश फुंडकर

मुंबई : राज्यातील कारखान्यांमध्ये आणि औद्योगिक कंपन्यांमध्ये मशीनवर काम करताना अपघात होऊन हात गमावावा

Forest Minister Ganesh Naik : मानव वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी १ हजार गावांमध्ये 'एआय अर्लट' यंत्रणा

वनमंत्री गणेश नाईक यांची घोषणा; २६० कोटींच्या कृती आराखड्यास मंजुरी मुंबई : राज्यातील वाढता मानव व वन्यजीव

Revenue Minister Bawankule : चाऱ्यासाठी सरकारी जमिनीवर आता गवत लागवड!

 बचत गट आणि बेरोजगार संस्थांशी भाडेकरार ; महसूलमंत्री बावनकुळे यांची महत्त्वाकांक्षी योजना मुंबई : गाव,

State President Ravindra Chavan : विधानपरिषदेच्या १२ जागांसाठी भाजपकडून ४८ नावांची यादी तयार

दिल्लीत होणार शिक्कामोर्तब; प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण केंद्रीय गृहमंत्री, राष्ट्रीय अध्यक्षांची भेट

८९ हजार कोटींच्या ५ प्रकल्पांना विशेष प्रोत्साहन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

२० हजार रोजगार निर्माण होणार; मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मंजुरी मुंबई :