मुंबई : चिंचपोकळी रेल्वे स्थानकाजवळील संत ज्ञानेश्वर पुलावर ट्रकच्या चाकाखाली येऊन डिलिव्हरी बॉयचा मृत्यू झाला. ही घटना (Chinchpokli Accident) सोमवारी (२५ नोव्हेंबर) दुपारी २.१५ च्या सुमारास घडली. याप्रकरणी काळाचौकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शंकरप्पा असे मृत्यू झालेल्या डिलिव्हरी बॉयचे नाव असून तो धारावी येथील रहिवासी आहे. शंकरप्पा हा इडलीची डिलिव्हरी देण्यासाठी ॲक्टिव्हा स्कूटरवरून चिंचपोकळी पुलावरून लालबागच्या दिशेने जात एका वळणावर त्याचा तोल गेला आणि ट्रकच्या मागच्या चाकाखाली येऊन त्याचा मृत्यू झाला.
Mumbai Water Cut : मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! मुंबईत दोन दिवस या भागातील पाणीपुरवठा राहणार बंद;
या घटनेनंतर ट्रक चालकाने मदत करण्याऐवजी घटनास्थळावरून पळ काढला. त्यानंतर रात्री उशीरा त्याने स्वत:ला काळाचौकी पोलिसांच्या स्वाधीन केले.
मिळालेल्या माहितीनुसार, धम्म प्रसाद (वय, ५०) असे अटक झालेल्या ट्रकचालकाचे नाव आहे. प्रसाद हा मूळचा उत्तर प्रदेशचा असून गेल्या ३५ वर्षांपासून मुंबईत काम करतो. अपघाताच्या वेळी (Chinchpokli Accident) तो रिकामा ट्रक दारूखान्याच्या दिशेने चालवत होता. या घटनेचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.