मुंबई : रेल्वे प्रशासनाद्वारे (Railway Administration) दर रविवारी दुरुस्तीच्या कामासाठी ब्लॉक (Megablock) घेण्यात येतो. मात्र आता मध्य रेल्वेवर (Central Railway) पुढील तीन दिवस ट्रॅफिक ब्लॉक (Traffic Block) घेण्यात येणार आहे. हा ब्लॉक रात्रकालीन कालावधीत घेण्यात येणार असल्यामुळे दिवसा प्रवाशांचा खोळंबा होणार नाही. मात्र यावेळी काही मेल-एक्सप्रेस गाड्या उशिराने धावणार आहेत. त्यामुळे प्रवाशांना काहीसा त्रास सहन करावा लागणार आहे.
वेळ काय?
- मंगळवार, २६ नोव्हेंबर – रात्री १२ वाजून ५० मिनिटं ते पहाटे ५ वाजून ५० मिनिटं
- बुधवार, २७ नोव्हेंबर – रात्री १२ वाजून ४० मिनिटंते पहाटे ५ वाजून ४० मिनिटं
- गुरुवार, २८ नोव्हेंबर – रात्री १ वाजून ५० मिनिटं ते सकाळी ६ वाजता
कोणत्या गाड्या उशिराने सुटणार?
- लोकमान्य टिळक टर्मिनस – गोरखपूर : ३० ते४० मिनिट उशिराने
- लोकमान्य टिळक टर्मिनस – अयोध्या छावणी (२७ नोव्हेंबर) : २० मिनिट उशिराने