
लखनऊ : जीपीएस(GPS) सिस्टीमच्या भरवश्यावर आपल्या डेस्टिनेशनपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणे जीवावरही बेतू शकते. उत्तर प्रदेशात ही हैराणजनक घटना घडली आहे. यात लग्न सोहळ्याला जात असलेल्या कारमधल तीन मित्रांचा मृत्यू झाला. कुटुंबियांचा दावा आहे की ही घटना जीपीएस सिस्टीममुळे घडली. कारण कार जीपीएस सिस्टीमच्या मदतीने जात होती.

मुंबई: महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) नुकतीच मुंबईमधील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर केलेल्या कारवाईत सिएरा लिओन येथून ...
अपघाताप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी कार पुलावरून रामगंगा नदीत पडल्याने तीन जणांचा मृत्यू झाला. पोलिसांना संशय आहे की ड्रायव्हर जीपीएस सिस्टीममुळे असुरक्षित मार्गावर गेला. ही घटना खालपूर-दातागंज मार्गावर सकाळी १० वाजण्याच्या सुमारास घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, सर्कल ऑफिसर आशुतोष शिवम म्हणाले, या वर्षाच्या सुरूवातीला पुरामळे पूलाचा पुढचा भाग नदीत पडला. मात्र हा बदल सिस्टीममध्ये अपडेट करण्यात आला नव्हता. पोलिसांनी सांगितले की ड्रायव्हर नेव्हिगेशन सिस्टीमचा वापर करत होता. त्यामुळे पूल असुरक्षित असल्याचे त्याला समजले नाही. यामुळे कार कोसळली. या दुर्घटनेत कारमधील तिघांचा मृत्यू झाला.
कार नदीत पडल्याची माहिती ग्रामस्थांनी पोलिसांना दिली. यानंतर कारमधून मृतदेह बाहेर काढण्यात आले आणि पोस्टमार्टेमसाठी पाठवण्यात आले.