Monday, February 10, 2025
Homeताज्या घडामोडीRaj Thackeray MNS : राज ठाकरेंचं इंजिन चिन्ह धोक्यात; मनसे पक्षाची मान्यता...

Raj Thackeray MNS : राज ठाकरेंचं इंजिन चिन्ह धोक्यात; मनसे पक्षाची मान्यता रद्द होण्याची शक्यता!

मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निकालात (Assembly Election 2024) महायुती (Mahayuti) सरकार बहुमताने विजयी झाले आहे. परंतु दुसरीकडे राज ठाकरेंच्या (Raj Thackeray) मनसेला (MNS) मोठा फटका बसला आहे. मनसे पक्षाकडून १२८ जागांवर उमेदवार निवडणूक लढवत होते. मात्र एकही आमदार विजयी होऊ न शकल्यामुळे राज ठाकरे यांना मोठा धक्का सहन करावा लागत आहे. अशातच मनसे पक्षाची मान्यता आता रद्द होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

CM Eknath Shinde : महायुतीच्या विजयानंतर लाडक्या बहिणींचे पुढील हप्त्याकडे लक्ष; कधी मिळणार?

मनसेचा पक्ष धोक्यात का?

निवडणूक आयोगाच्या (Election Commision) निकषानुसार, एखाद्या पक्षाला मान्यता टिकवायची असल्यास त्या पक्षाला एकूण ८ टक्के मतदान आणि १ जागा किंवा २ जागा आणि ६ टक्के मतदान किंवा ३ जागा आणि ३ टक्के मतदान यापैकी एक निकष त्या पक्षानं पूर्ण करणं आवश्यक आहे. मात्र मनसेला एकही जागा मिळाली नसून ४८ लाख मते देखील मिळाली नाहीत, त्यामुळे मनसे पक्षाची मान्यता रद्द होऊ शकते, असे विधिमंडळाचे माजी प्रधान सचिव अनंत कळसे यांनी सांगितले.

मान्यता रद्द झाल्यास काय परिणाम होणार?

मान्यता रद्द होणे म्हणजे पक्षाचे चिन्ह धोक्यात येणे. म्हणजेच राज ठाकरेंच इंजिन चिन्ह धोक्यात येऊ शकतं यापुढे त्यांना ते चिन्ह मिळू शकणार नाही. पुढील निवडणूक लढवण्यास राज ठाकरे यांना दुसरे चिन्ह घ्यावे लागेल.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -