PM Narendra Modi : संसदेत गदारोळ घालणाऱ्या लोकांना जनतेनेच नाकारले!

पंतप्रधानांचे विरोधकांवर टीकास्त्र


नवी दिल्ली : विधानसभा निवडणुकीचे निकाल (Assembly Election Result 2024) जाहीर झाले असून आजपासून संसदेचे हिवाळी अधिवेशनाला (Winter Session of Parliament) सुरुवात होणार आहे. तत्पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी जनतेला संबोधित करताना विरोधकांवर टीकास्त्र सोडले आहे.



यंदाचे संसदेच हे सत्र विशेष असणार आहे. कारण 'देशाची राज्यघटना लिहून ७५ वर्षे पूर्ण झाली असून संसदेत आम्ही सर्वजण मिळून संविधान उत्सवाला सुरुवात करणार आहे. त्यामुळे भारतीय संविधानासारखा इतका चांगला दस्ताऐवज आपल्याला मिळाला आहे', असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले.



...म्हणून अशा लोकांना जनतेने नाकारले


विरोधक संसदेत येवून गोंधळ घालतात, त्यामुळे अशा लोकांना जनतेनेच नाकारले आहे. तसेच नविन उर्जा, उत्साह घेऊन आलेल्या नवनिर्वाचित खासदारांना हे गदारोळ घालणारे लोक बोलू देत नाहीत. त्यांच्या आवाज दाबला जातो, त्यामुळे संसदेमधील चर्चेमध्ये सर्वांनी जास्तीत जास्त सहभाग घ्यावा असे पंतप्रधानांनी म्हटले.


त्याचबरोबर, भारतातील मतदार लोकशाहीला समर्पित आहेत, त्यांचे संविधानाप्रती समर्पण आहे, त्यांचा संसदीय कार्यपद्धतीवरचा विश्वास आहे. त्यामुळे पुन्हा एकदा सर्व आदरणीय खासदारांना हे अधिवेशन उत्साहाने आणि उत्साहाने पुढे नेण्यासाठी आमंत्रित करतो, असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले.

Comments
Add Comment

प्रतिकूल हवामानामुळे वैष्णोदेवी यात्रा ७ ऑक्टोबरपर्यंत स्थगित

जम्मू :  जम्मू आणि काश्मीरमधील तीव्र हवामानाच्या इशाऱ्यामुळे, वैष्णोदेवी यात्रा ५ ते ७ ऑक्टोबर दरम्यान स्थगित

दार्जिलिंगमध्ये मुसळधार पावसाचा कहर; भूस्खलनात १७ जणांचा मृत्यू, सिक्कीमशी संपर्क तुटला

उत्तराखंड : दार्जिलिंगमध्ये झालेल्या अतिमुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणावर भूस्खलन झाले असून, आतापर्यंत १७

‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; मच्छीमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना

मुंबई : ईशान्य अरबी समुद्रात निर्माण झालेल्या ‘शक्ती’ (Shakti) या चक्रीवादळाची तीव्रता वाढत असून, पुढील काही दिवसांत

फास्टॅगशिवाय रोखीने पैसे भरणाऱ्यांना १५ नोव्हेंबरपासून लागणार दुप्पट टोल

नवी दिल्ली : केंद्र सरकारने टोल प्लाझाच्या नियमांमध्ये महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. वैध फास्टॅग असलेल्या वाहन

फक्त शांत झोपेसाठी लोक करताहेत लांबचा प्रवास

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सध्या कामाच्या धकाधकीत लोकांची झोपण्याची वेळ कमी होत चालली आहे. दिवसभरात बऱ्याच गोष्टी

लालूंच्या निवासस्थांनी उमेदवारीवरुन गोंधळ

पाटणा : बिहारमधील विधानसभेची निवडणूक अगदी जवळ आली आहे. इच्छुक उमेदवार आणि त्यांचे समर्थक तिकीट पक्के करण्यासाठी