ढाका : भारताचे दिग्गज उद्योगपती गौतम अदानी (Gautam Adani) यांच्यावर अमेरिकन न्यायालयाने लाचखोरी प्रकरणाबाबत दोषी ठरवले. त्यांनंतर कारवाई करण्यात आली असून त्यांच्याविरुद्ध अटक वॉरंट देखील जारी करण्यात आले. मात्र या प्रकरणामुळे अदानी समुहाला मोठ्या अडचनींचा सामना करावा लागला. अदानी समूहाचे शेअरर्स धडाधड कोसळले असून नुकतीच केनियाने अदानींशी संबंधित प्रकल्प रद्द करण्याची घोषणा केली. त्यामुळे अदानी समूहाला मोठा धक्का बसला. तसेच आता बांगलादेशनेही मोठे पाऊल उचलले आहे.
Winter : थंडीत गिझरच्या वापरामुळे खूप बिल येते, या टिप्स वापरा होईल बचत
मिळालेल्या माहितीनुसार, अदानी समूहाने बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या काळात बांगलादेशात विविध व्यावसायिक ग्रुपसोबत ऊर्जा करार केले होते. त्यामुळे केनियानंतर आता बांगलादेशही अदानींच्या प्रकल्पांची चौकशी करणार आहे.
बांगलादेश सरकारने या तपासणीचे कारण स्पष्ट करताना म्हटले आहे की, हे प्रकल्प शेख हसीना यांच्या शासनकाळातील निर्णय असून, या करारामधील काही करार अत्यंत विवादास्पद ठरले आहेत. यामुळे सरकारने वीज निर्मिती क्षेत्रातील प्रकल्पांचे पुनरावलोकन करण्याचा निर्णय घेतला आहे.