Monday, May 12, 2025

मजेत मस्त तंदुरुस्तताज्या घडामोडी

Health: डाएटमध्ये सामील करा या गोष्टी, कमी होईल कॅन्सरचा धोका

Health: डाएटमध्ये सामील करा या गोष्टी, कमी होईल कॅन्सरचा धोका

मुंबई: कॅन्सरसारख्या घातक आजारांचे नाव ऐकताच मृत्यू दिसू लागतो. मात्र तज्ञांच्या मते जर आपण आपले डाएट व्यवस्थित ठवले तर कॅन्सरचा धोका बऱ्याच प्रमाणात कमी करू शकतो. आज आम्ही तुम्हाला त्या सुपरफूडबद्दल सांगणार आहोत ज्याचे सेवन करून तुम्ही कॅन्सरचा धोका टाळू शकतो.



ही फळे कॅन्सर रोखण्यास मदत करतात


ब्लूबेरी, स्ट्रॉबेरी, रासबेरी, ब्लॅकबेरी या फळांमध्ये एंथोसायसिन आणि एलेजिक अॅसिडसारखी अँटीऑक्सिडंट असतात. यामुळे कॅन्सरपासून बचाव होण्यास मदत होते.



आंबट फळे - संत्रे, लिंबू, द्राक्षे


यात व्हिटामिन सी, फ्लॅवेनॉईड्स आणि लिमोनोईड्स. यामुळे रोगप्रतिकारक क्षमता वाढते.



डाळिंब


यात कॅन्सरविरोधी गुण असलेले एलेजिक अॅसिड आणि पॉलिफेनॉल्स असतात यामुळे प्रोस्टेट आणि ब्रेस्ट कॅन्सरचा धोका कमी होण्यास मदत होते.



पपई


बीटा कॅरोटिन, लायकोपिन आणि व्हिटामिन सी असलेले पपई टिश्यूंना रिपेअर करण्यास मदत करतात.



ब्रोकोली


यात सल्फोराफेन आणि इंडोल-३ कार्बिनोल असते ज्यामुळे कॅन्सरचा धोका कमी होतो.


हिरव्या भाज्यांमध्ये कॅरोटिनॉईड, फायबर आणि फोलेट भरपूर प्रमाणात असते. यामुळे त्वचा, फुफ्फुसे आणि पोटाचा कॅन्सर होण्याचा धोका कमी होतो.



टोमॅ


टोमॅटोमध्ये लायकोपीन भरपूर प्रमाणात असते. हा कॅन्सरला रोखणारा घटक आहे. यामुळे प्रोस्टेट आणि फुफ्फुसांच्या कॅन्सरमध्ये फायदा होतो.

Comments
Add Comment