मुंबई : गुगल (Google) प्रत्येक विशेष प्रसंगासाठी त्याचे खास डूडल (Doodle) लाँच करत असतो. आता देखील गुगलने एक खास डूडल तयार केलं आहे. या डूडलमध्ये चेस म्हणजेच बुद्धिबळ खेळ (Chess Google Doodle) असल्याचे दिसून येते. मात्र आज हे गुगलने डुडल का तयार केले आहे, जाणून घ्या.
Health: डाएटमध्ये सामील करा या गोष्टी, कमी होईल कॅन्सरचा धोका
२५ नोव्हेंबर ते १३ डिसेंबर दरम्यान सिंगापूरच्या रिसॉर्ट्स वर्ल्ड सेंटोसा येथील 2024 FIDE वर्ल्ड चॅम्पियनशिपची फायनल पार पडणार आहे. त्याअंतर्गत गुगल एक अप्रतिम डूडल बनवून हा गेम साजरा करत आहे.
भारतीय वेळेनुसार दुपारी अडीच वाजेच्या सयमारास हा खेळ सुरु होणार असून १८ वर्षीय भारतीय खेळाडू गुकेश डोमराजू आणि चीनचा डिंग लिरेन यांच्यात लढत होणार आहे. दरम्यान, जर भारतीय बुद्धिबळपटू गुकेश डोमराजू अनुभवी ग्रँडमास्टरला पराभूत करण्यात यशस्वी झाला तर तो सर्वात तरुण निर्विवाद विश्वविजेता म्हणून इतिहासात उतरेल.