पुणे: इंडिगो विमान कंपनीकडून पुण्यातून दुबई आणि बँकॉकसाठी थेट विमान सेवा सुरू झाली. दोन्ही विमानांना प्रवाशांचा चांगला प्रतिसाद असल्याचे दिसून आले. बँकॉकसाठी विमानसेवा सुरू झाल्यामुळे पुण्यातून तिसरी आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू झाली आहे.
३४ कोटींच्या कोकेनची तस्करी करणाऱ्या संशयिताला मुंबई विमानतळावरून अटक
पुणे विमानतळावरून सध्या सिंगापूर आणि दुबाईसाठी विमानसेवा सुरू होती. पण, इंडिगोकडून दुबई आणि बँकॉकसाठी विमान सेवा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार दुबईसाठी दररोज मध्यरात्री बारा वाजून १५ मिनिटांनी विमान उड्डाण करेल. ते पहाटे दोन वाजून १५ मिनिटांनी दुबाईला पोहोचले. तर, दुबई येथून पाच वाजून ४० मिनिटांनी पुण्यासाठी उड्डाण करेल. ते पुण्यात रात्री दहा वाजून १० मिनिटांनी दाखल होईल.तर बँकॉकसाठी पुण्यातून बुधवार, शुक्रवार आणि रविवारी विमानसेवा सुरू असेल. ते रात्री अकरा वाजून १० मिनिटांनी पुण्यातून सुटेल. तर, बँकॉक येथून पुण्यासाठी सोमवार, गुरुवार आणि शनिवारी विमानसेवा असणार आहे. बँकॉक येथून मध्यरात्री एक वाजून १५ मिनिटांनी पुण्यासाठी सुटेल. ते पुण्यात पहाटे सव्वाचार वाजता दाखल होईल. दोन आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू झाल्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.