Monday, February 17, 2025
Homeराशिभविष्यWeekly Horoscope : साप्ताहिक भविष्य, २४ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर २०२४

Weekly Horoscope : साप्ताहिक भविष्य, २४ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर २०२४

साप्ताहिक राशिभविष्य, २४ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर २०२४

सहयोग मिळणार

मेष : भागीदारी व्यवसायांमध्ये काही वादविवाद असतील तर ते संपवण्याची वेळ आहे. कामांमध्ये नीट लक्ष देऊन आणि शांतरीतीने आपले काम करावे. या कालावधीमध्ये जास्तीत जास्त मेहनत व चांगल्या रीतीने काम करण्याचा प्रयत्न करणार आहात. आपणास मित्रांचा सहयोग मिळणार आहे. कोणत्याही प्रकारच्या व्यवहारात पैशाच्या देवाण-घेवाणीच्या व्यवहार करताना सतर्क असावे. फसवणुकीचे व्यवहार होऊ शकतात. राजनीतीतील व्यक्तीने भाषा संयमी ठेवावी. या कालावधीमध्ये आपले वाहन कोणालाही देऊ नका व कोणाचेही वाहन आपण वापरू नका. वाहन चालवताना सांभाळून चालवणे

आर्थिक फायदे

वृषभ : वडिलांचे आपणास पूर्ण सहकार्य लाभणार आहे. ज्या व्यक्ती व्यापार-व्यवसायात आहेत, त्यांना वडिलांकडून आर्थिक मदत मिळू शकते. सप्ताहाच्या मध्यावधीमध्ये आपणास जर गुंतवणूक करण्याची इच्छा असेल, तर विचारपूर्वक गुंतवणूक करणे आवश्यक आहे. एखाद्या मोठ्या कंपनीकडून आपणास चांगल्यापैकी ऑर्डर मिळणार आहे. ही ऑर्डर पूर्ण करण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करणार आहात. आपले प्रयत्न चांगल्या रीतीने यशस्वी होणार आहेत. आर्थिक फायदे होणार आहेत. व्यापार व्यवसायामध्ये वृद्धी होणार आहे. उधारी वसूल होईल. कुटुंबातील वातावरण सुखद राहील. तरुण-तरुणींचे प्रश्न मार्गी लागतील. त्यांच्याशी आपले चांगले संबंध असणार आहेत. महत्वाचे प्रश्न सुटतील.

सतर्क राहून काम करा

मिथुन : आपला आत्मविश्वास चांगला असणार आहे. आपली एनर्जी लेव्हल पण उच्चप्रतीची असणार आहे. ज्या व्यक्तींचा व्यवसाय पारंपरिक आहे हे त्यांचे व्यवसाय मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. मोठ्या मल्टिनॅशनल कंपनीमध्ये आपणास मोठी जबाबदारी दिली जाऊ शकते, आपण खूप सतर्क राहून काम करा. या कालावधीमध्ये आपण अतिशय कामामध्ये व्यस्त असणार आहात. त्यामुळे घरात व मुलांकडे कमी लक्ष दिले जाऊ शकते. मुलांच्या विद्या अभ्यासाकडे लक्ष द्या. त्यांचे काही प्रश्न असतील तर त्यामध्ये जातीने लक्ष घाला.

जीवनामध्ये आनंद असेल

कर्क : आपल्या इनकमपेक्षा खर्च खूप जास्त होणार आहे. तरी ती एक प्रकारची गुंतवणूक आहे असे म्हणू शकतो. पुढे जाऊन त्याचा फायदा होणार आहे. जी व्यक्ती नवीन नोकरी शोधत आहेत त्यांना चांगल्यापैकी नोकरी मिळणार आहे. वैवाहिक जीवनामध्ये आनंद असेल आणि गोडवा असणार आहे. प्रेमी-प्रेमिकांसाठी हा अनुकूल काळ आहे. हा कालावधी आपणासाठी अतिशय अनुकूल आहे. खेळ, क्रीडा क्षेत्र यामधील व्यक्तींना लोक आश्चर्यचकित होतील, असे यश मिळणार आहे. नोकरी-व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींना नवीन नवीन संधी येणार आहेत. महिलांना हा कालावधी आनंदाचा व मनोरंजनाचा असणार आहे.

महत्त्वाचे प्रश्न सुटतील

सिंह : आपल्याला व्यापार व्यवसायामध्ये बऱ्याच अडचणी येत होत्या, त्यामध्ये आपणास मार्ग सापडणार आहे. जे जातक नोकरी शोधत होते त्यांना नोकरी मिळणार आहे. आपले रचनात्मक कार्य कौशल्यामुळे आपले वरिष्ठ खूश होणार आहेत. ज्या व्यक्तींना सुट्टीची आवश्यकता आहे त्यांना सुट्टी मिळणार नाही, असे वातावरण होण्याची शक्यता आहे. व्यवसायामध्ये आपणाला नवीन क्लायंट मिळण्याची शक्यता आहे. त्यांच्याशी आपले चांगले संबंध असणार आहेत. महत्वाचे प्रश्न सुटतील. अडचणींवर मात करण्याचे कौशल्य आपणाकडे आहे.

अपेक्षित यश प्राप्त होणार आहे

कन्या : राजकीय क्षेत्रातील व्यक्तींना अपेक्षित यश प्राप्त होणार आहे. वैवाहिक जीवनामध्ये मधुरता येणार आहे. व्यक्तिमत्त्व विकासासाठी केलेले प्रयत्न सफल होतील. भागीदारीच्या व्यवसायामध्ये पारदर्शकता असणे फार आवश्यक आहे. खोट्या व चुकीच्या गोष्टींना अजिबात स्थान देऊ नका. हिशोबातील गडबडीमुळे आपणाला खूप त्रास होऊ शकतो. आपल्या प्रकृती स्वास्थ्याला पण आपण जपणे आवश्यक आहे. अचानक प्रकृती बिघडून पुढचा कार्यक्रम बिघडण्याची शक्यता आहे.

नवीन मार्ग मिळणार आहेत 

तूळ : व्यापार-व्यावसायिकांच्या व्यापारात वाढ होणार आहे. पैसे मिळवण्याचे नवीन नवीन मार्ग मिळणार आहेत. आपणाला जर गुंतवणूक करायची असल्यास ती स्थिर मालमत्तेत करू शकता. ज्या व्यक्ती बेरोजगार आहेत त्यांना नोकरी मिळणार आहे. सप्ताहाच्या मध्यावधीमध्ये आपल्या जोडीदाराच्या मनात कुठले तरी भय उत्पन्न होण्याची शक्यता आहे. कुटुंबामध्ये सर्व चांगले चालत असून सुद्धा मनामध्ये एक प्रकारचा गोंधळ असण्याची शक्यता आहे, काय करावे आणि काय नाही या मनस्थितीतून आपण जाणार आहात. जुने आजार वर तोंड काढण्याची शक्यता आहे.

आर्थिकदृष्ट्या चांगला काळ

वृश्चिक : आपणास अनुकूल कालावधी असणार आहे. परदेशांमध्ये प्रवास करण्याचा आपला विचार असेल, त्यासाठी आपण प्रयत्न करत असाल, तर त्यासाठी हा कालावधी अतिशय चांगला आहे. आपण जर आपल्या घरापासून लांब नोकरी करत असाल तर आपल्या इच्छेनुसार आपली बदली होऊ शकते. आर्थिकदृष्ट्या चांगला काळ. व्यापार-व्यवसाय असेल, तर अनेक ठिकाणी आपणास प्रवास करावा लागणार आहे. त्यामुळे आपले व्यावसायिक संबंध चांगले होणार आहेत. आपले निर्णय योग्य ठरतील.

संबंध मधुर होणार आहेत

धनु : आपल्या बहीण-भावाविषयी आपले संबंध मधुर होणार आहेत. आपण जर व्यापार व्यवसाय करत असाल तर आपल्या वडिलांचे सहाय्य आपणास मिळणार आहे. आपला देवावर विश्वास बसण्याची शक्यता आहे. अध्यात्मामध्ये आपणास गोडी निर्माण होणार आहे. एखाद्या धार्मिक मंगल कार्याचे आयोजन आपल्याकडे होऊ शकते. आपल्या जोडीदाराचे आपल्याला पूर्ण सहकार्य असणार आहे. आपण जोडीदाराला चांगले समजून घेणार आहात. कार्यक्षेत्र वाढेल.

चांगले यश मिळेल

मकर : आपल्यामधील धैर्याची आणि पराक्रमाची वाढ होणार आहे. नोकरी आणि व्यवसायामध्ये आपले परिश्रम वाढणार आहेत. जे काम आपण केले आहे याचा फायदा निश्चित मिळणार आहे. आपल्या कार्यक्षेत्रातील टार्गेट आपण सहज पूर्ण करणार आहात. आपला या कालावधीमध्ये प्रवास होण्याचीही शक्यता आहे. जे विद्यार्थी टेक्निकल साईडला आहेत त्यांना विशेष महत्त्व येणार आहे. आपल्या कार्यक्षेत्रात किंवा विद्यार्थ्यांनी अभ्यासात अजिबात आळस करू नका. जे पीएच.डी. किंवा संशोधनाचे कार्य करत आहेत त्यांना चांगले यश मिळेल. प्रवासात नवीन मित्र मिळतील.

नवी ओळख निर्माण होईल

कुंभ : ज्या व्यक्ती नोकरी शोधत होत्या, त्यांचा शोध थांबणार आहे. त्यांना चांगल्या ठिकाणी नोकरी मिळणार आहे. वारसा हक्काच्या संपत्तीमध्ये वाद चालले होते, ते मिटवून आपणास त्याचा लाभ होणार आहे. आपला खर्च काही कपड्यांवर होईल. काही पैशांची गुंतवणूक सोन्यामध्ये करणार आहात. तयार कपडे आणि सौंदर्य प्रसाधने यामध्ये ज्यांचा व्यवसाय आहे, त्यांना चांगले फायदे होतील. व्यवसायातील नफ्याचे प्रमाण वाढणार आहे. नोकरी-व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींना नवीन नवीन संधी येणार आहेत. ज्या व्यक्ती नोकरी करत आहेत, त्यांनी पहिल्यापेक्षा जास्त परिश्रम घेतल्यास त्यांच्या ऑफिसमध्ये वेगळी अशी ओळख निर्माण होईल.

चांगला फायदा

मीन : व्यापार-व्यवसायिकांना जर व्यवसायासाठी कर्ज हवे असेल तर ते त्यांना मिळणार आहे. नवीन व्यवसायिकांना याचा चांगला फायदा होणार आहे. आपली मालमत्ता विकायची असल्यास, त्यामध्ये सुद्धा आपणास चांगला फायदा मिळणार आहे. आपल्या आई किंवा पत्नीच्या नावाने जर शेअर्स असतील, तर त्यामध्ये मोठ्या प्रमाणात फायदा होईल. नोकरी करणाऱ्यांनी मात्र आपल्या वागण्या-बोलण्यात काळजी घ्या. जे पीएच.डी. किंवा संशोधनाचे कार्य करत आहेत त्यांना चांगले यश मिळेल. आपल्या अधिकारी व्यक्तीशी चांगले संबंध ठेवण्याचा प्रयत्न करा. महत्वाचे प्रश्न सुटतील.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -