Whatsapp New Features : व्हॉट्सअ‍ॅपवर आले 'हे' नवे फिचर; लगेचच करा ट्राय!

मुंबई : सोशल मीडियावरील (Social Media) व्हॉट्सअ‍ॅप (Whatsapp) प्लॅटफॉर्मने गुगलचा सर्वोत्कृष्ट मल्टी-डिव्हाइस ॲप पुरस्कार जिंकला आहे. वापरकर्त्यांच्या सोयीसाठी सातत्याने नवनवीन अपडेट्स (Whatsapp New Features) समोर येत असतात. अशातच आता पुन्हा नवी फिचर व्हॉट्सअ‍ॅपवर लागू झाले आहेत.



नवीन फिल्टर


व्हॉट्सॲपवर कंटाळवाणे फिल्टरलेस व्हिडिओ करत होता, पण आता तुम्ही तुमची पार्श्वभूमी बदलू शकता. जर तुम्ही कमी प्रकाशात बसला असाल तर तुम्ही व्हिडिओवर फिल्टरही लावू शकता. हेच फिल्टर व्हॉट्सॲप व्हिडिओ कॉलवरही लागू असणार आहेत.



वन टाइम व्हॉइस नोट्स


आतापर्यंत वापरकर्ते वन टाइम मोडमध्ये फोटो आणि व्हिडिओ पाठवू शकत होते. परंतु आता वैयक्तिक व्हॉइस नोट्स देखील पाठवू शकणार आहेत. Quick Send Voice Note द्वारे समोरची व्यक्ती व्हॉइस नोट्स फक्त एकदाच ऐकू शकते, त्यानंतर तुमची पाठवलेली व्हॉइस नोट ऐकू शकणार नाही.



नवीन चॅट श्रेणी


आता तुम्ही एक नवीन चॅट श्रेणी तयार करू शकता, ज्यामध्ये तुम्ही मित्रांसाठी, कुटुंबासाठी, ऑफिसमधील लोकांसाठी आणि पालकांसाठी स्वतंत्र चॅट लिस्ट तयार करू शकता. यामुळे तुम्ही एका मेसेजकडेही दुर्लक्ष करू शकणार नाही, तुमचे लक्ष प्रत्येक मेसेजवर असेल.



थेट व्हॉट्सॲपवर सेव्ह करा नंबर


याआधी व्हॉट्सॲपवर कुणाशी बोलायचे झाल्यास तुम्हाला नंबर फोनमध्ये सेव्ह करावा लागत होता. आता तुम्ही थेट व्हॉट्सॲपवर कॉन्टॅक्ट सेव्ह करू शकणार आहात.



व्हिडिओ स्टेटस लाईक आणि रीशेअर


Instagram आणि Facebook प्रमाणे आता व्हॉट्सअ‍ॅपवरही स्टेटस लाईक आणि रीशेअर करू शकता. तसेच स्टेटसवर मेन्शन देखील करु शकणार आहात. (Whatsapp New Features)

Comments
Add Comment

मुंबईतील १२ मेट्रो स्थानकांवर स्मार्ट लॉकर सुरू

मुंबई : भारताच्या सार्वजनिक वाहतूक इकोसिस्टमसाठी निर्बाध डिजिटल पेमेंट्स आणि सेवा सक्षम करणाऱ्या ऑटोपे पेमेंट

पाकिस्तानवरील हवाईक्षेत्र रोखले गेल्याने एअर इंडिया आर्थिक अडचणीत

पहलगाम घटनेनंतर संबंध विकोपाला गेल्याचा फटका नवी दिल्ली  :  पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानचे

इंदुरीकर महाराज झाले नेटकऱ्यांच्या टीकेचे धनी

मुंबई : आपल्या खास शैलीत कीर्तन आणि समाजप्रबोधन करणारे इंदुरीकर महाराज आपल्या मुलीच्या साखरपुड्यात केलेल्या

मुंबईच्या राम मंदिर स्टेशनवर जन्मलेले बाळ झाले 'नैसर्गिकरित्या बरे'.

मुंबई : राम मंदिर स्टेशनवर जन्मलेल्या बाळाची तब्येत जन्मानंतर काही तासांत खालावली होती. पण वेळेत उपचार

नवीन फौजदारी कायद्यांच्या अंमलबजावणीतून पीडितांच्या न्यायाची हमी

मुंबई : ब्रिटिशकालीन फौजदारी कायद्यांमध्ये डिजिटल आणि इलेक्ट्रॉनिक स्वरूपातील पुरावे गृहीत धरण्याची तरतूद

क्विक हीलने टोटल सिक्‍युरिटी व्‍हर्जन२६ लाँच सायबर क्राईमपासून आता संपूर्ण मुक्ती मिळणार

मुंबई: क्विक हील टेक्‍नॉलॉजीज लिमिटेड या जागतिक सायबरसुरक्षा उपाययोजना प्रदाता कंपनीने आज क्विक हील टोटल