मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५साठीचा(IPL) मेगा लिलाव सुरू झाला आहे. हा लिलाव २४ आणि २५ नोव्हेंबरला सौदी अरेबियातील जेद्दामध्ये होत आहे. पहिल्या दिवशी सर्वांच्या नजरा स्टार विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंतवर होत्या. त्याला लखनऊ सुपर जायंट्सने जबरदस्त बोली लावत २७ कोटी रूपयांना खरेदी केले. या पद्धतीने पंतने २० मिनिटांत आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडूचा रेकॉर्ड तोडला.
पंतने गेल्या हंगामात दिल्ली कॅपिटल्सचने नेतृत्व केले होते. त्याला दिल्ली संघाला रिटेन केले नव्हते. अशातच पंत २०१६ नंतर पहिल्यांदा लिलावात उतरला. दरम्यान, पंत दिल्लीने आरटीएम कार्ड नियमाचा वापर केला होता. मात्र अखेरीस लखनऊ संघाने मोठी बोली लावत पंतला खरेदी केले.
RTM कार्डमुळे २७ कोटींचा विकला गेला पंत
खरंतर, ऋषभ पंतची बोली जेव्हा २०.७५ कोटी रूपयांपर्यंत पोहोचली तेव्हा दिल्ली कॅपिटल्सने आरटीएम कार्डचा वापर केला. दरम्यान, लखनऊ सुपर जायंट्सने या लिलावासाठी २७ कोटी रूपये केले. त्यानंतर दिल्ली कॅपिटल्सने पुन्हा पंतसाठी आरटीएम करण्यास रस दाखवला नाही.
पंतसाठी लखनऊ सुपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूमध्ये जोरदार बोली लावली. यानंतर सनरायजर्स हैदराबादने एंट्री घेतली. दोघांमध्ये ही बोली २०.७५ कोटीपर्यंत पोहोचली होती.