Sunday, June 22, 2025

काव्यरंग : लेक आमुची ग्रेसी

काव्यरंग : लेक आमुची ग्रेसी

होतीस तू आमच्या कुटुंबातील लाडाची लेक,
तुझा शांत स्वभाव सर्वांसाठी होता नेक ||धृ||


तुझ्या सर्व आठवणींचे हिरवळीचे डोंगर उभे पाठीशी,
गेली नाहीस तू घरातून, रोजच होतो भास आम्हाशी ||१||


घरात येती पाहुणे त्यांच्या स्वागतास तू सज्ज असावे,
त्यांना पाहून बलूनसाठी हट्ट करुणी, खेळ तुझा दाखवत राही ||२||


उगीच याच्या-त्याच्यावर ना कधी भुंकत राहिली,
मी काही विशेष केलं म्हणून ना कधी मिरवीत राहिली ||३||


खरोखर तुझ्यासारखे घराघरात श्वान व्हावे आणि सर्वांचे मन राखावे. रागावलो असलो तुझ्यावर कधीतरी, परंतु प्रेमळ सदा तुझ्यासारखा चेहरा असावे ||४||


नाही कधी दाखविले रौद्ररूप तुझ्या स्वभावगुणी,
घराचा आणि टायगर लेकाचा सांभाळ केला प्रामाणिकपणी||५||


चिकन, अंडी, दूध, दही, बेरी, तूप, केक, पनीर, ड्रायफ्रूट लाडू, तुझ्या आवडीचे,
चपाती, भाकरी, भात, भाजी, शीळ चिकन, हे पदार्थ होते तुझ्या नावडीचे ||६||


वाटलं नव्हतं कधी जाशील इतक्या कमी वयात देवापाशी.
१६ जून २०२४ चा काळा दिवस ठरला रविवार तुझ्या मृत्यूशयाशी ||७||


घरी तुझ्या जागी वेदनांचे श्वास घेत असताना, श्वास तुझे विश्वास देत होते. परंतु निर्वानाचे क्षितीज दिसले, अंधःकार दुःख अश्रू होऊनी पहाटे ||८||


- डॉ. शिवदास कांबळे



कविता


हळूहळू पायऱ्या उतरते
पापण्यांवरी रात्र चांदणी
आर्त साद येतसे तुझी ती
स्वप्नांच्या त्या, गावामधुनी !


तसाच मागे मागे जातो,
तरूण होतो... स्वप्ने बघतो,
पुन्हा तुझ्या बेभान मिठीने भान हरपुनी,
तुला बिलगतो!


आपल्यातला सरे दुरावा
सरते अंतर क्षणाक्षणाने,
देह असे देहात मिसळती
हलके हलके... कणाकणाने !


त्या स्वप्नांच्या धुंद नशेतच
अजूनही मी, जगतो आहे...
किती काळ लोटला तरीही
वाट तुझी मी बघतो आहे!


- सदानंद डबीर

Comments
Add Comment