मुंबई: टीम इंडियासाठी नवे संकटमोचक आणि आयपीएलमध्ये लखनऊ सुपर जायंट्सचा माजी कर्णधार केएल राहुल आयपीएल २०२५साठी(IPL Auction 2025) नव्या संघाकडून खेळताना दिसेल. दरम्यान, तो नवा संघ आरसीबी नाही. आयपीएल २०२५च्या मेगा लिलावात दिल्ली कॅपिटल्सने केएल राहुलला १४ कोटींना खरेदी केले आहे.
लिलावात चेन्नई सुपर किंग्सने राहुलला खरेदी करण्याचा प्रयत्न केला. चेन्नईने राहुलला १३.७५ कोटी रूपयांपर्यंत बोली लावली. तर आरसीबीने आपले हात आधीच उभे केले. आरसीबीने राहुलसाठी १०.५० कोटी रूपयांपर्यंत बोली लावली.
ऋषभ पंत ठरला सगळ्यात महागडा, श्रेयस अय्यरलाही मिळाली मोठी रक्कम
कोलकाताला गेल्या वर्षी चॅम्पियन बनवणाऱ्या श्रेयस अय्यरला आयपीएल २०२५च्या लिलावात मोठी रक्कम मिळाली. अय्यरला पंजाब किंग्सने २६.७५ कोटी रूपयांची रक्कममध्ये खरेदी केले. आता ऋषभ पंत आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला. तर श्रेयस अय्यर दुसरा महागडा खेळाडू आहे. या दोन्ही खेळाडूंना त्यांच्या टीमने रिलीज केले होते. श्रेयस अय्यरला केकेआरने रिलीज केले होते. आता अय्यरला पंजाब किंग्सने २६.७५ कोटींना आणि ऋषभ पंतला लखनऊने २७ कोटींना खरेदी केले.