मुंबई: भारताचा कर्णधार रोहित शर्मा ऑस्ट्रेलियासाठी रवाना झाला आहे. पर्थमध्ये सुरू असलेल्या पहिल्या कसोटीत रोहित खेळत नाही आहे. रोहितची पत्नी रितीका सजदेहने नुकताच एका मुलाला जन्म दिला. रोहित याच कारणामुळे ऑस्ट्रेलियाला गेला नव्हता. मात्र एका रिपोर्टनुसार आता तो रवाना झाला आहे. तसेच अॅडलेडमध्ये खेळवल्या जाणाऱ्या सामन्याचा तो भाग होईल. टीम इंडिया रोहितच्या अनुपस्थितीत जसप्रीत बुमराहच्या नेतृत्वात खेळत आहे.
रोहितचे अनेक व्हिडिओज सोशल मीडियावर शेअर केले जात आहेत. दरम्यान, याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही. रोहित लवकरच टीम इंडियासोब दिसेल. दरम्यान, भारतीय संघ सध्या पर्थमध्ये आहे. येथे कसोटी मालिकेतील पहिला सामना खेळवला जात आहे.
रोहितसाठी मागील मालिका काही खास नव्हती. भारताला न्यूझीलंडविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला होता. रोहितने न्यूझीलंडविरुद्ध बंगळरू कसोटीच्या दुसऱ्या डावात अर्धशतक ठोकले होते. या खेळीनंतर तो सतत फ्लॉप राहिला. त्याने पुणे कसोटीत ८ धावा केल्या होत्या. यानंतर मुंबई कसोटीत पहिल्या डावात १८ धावा आणि दुसऱ्या डावात ११ धावा केल्या होत्या.आता रोहित ऑस्ट्रेलियाविरुद्ध कमबॅक करू शकतो.
पर्थमध्ये खेळवल्या जात असलेल्या कसोटीत भारतीय संघ मजबूत स्थितीत आहे. टीम इंडियाने पहिल्या डावात १५० धावा केल्या होत्या. मात्र दुसऱ्या डावात शानदार कमबॅक केले. भारताने एकही विकेट न गमावता १७२ धावा केल्या आहेत. भारतीय संघ सध्या २१८धावांच्या आघाडीवर आहे.