Saturday, May 10, 2025

महाराष्ट्रताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूज

Mumabi-Pune Express Way: मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर वारजे पुलाजवळ गॅस टँकर पलटी; साताऱ्याच्या दिशेने जाणारी वाहतूक ठप्प

Mumabi-Pune Express Way: मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर वारजे पुलाजवळ गॅस टँकर पलटी; साताऱ्याच्या दिशेने जाणारी वाहतूक ठप्प
पुणे: मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर वारजे पुलाजवळ चर्चच्या बाजूला आज सकाळी गॅस टँकर पलटी झाल्याची दुर्घटना घडली. मुंबईहून साताऱ्याच्या दिशेने जाणाऱ्या या टँकरला अचानक तोल गमावल्यामुळे हा अपघात घडला. अपघातामुळे या मार्गावरील वाहतूक पूर्णतः ठप्प झाली असून वाहनचालकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.



अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा घटनास्थळी पोहोचली. गॅस टँकरमधून गळती होण्याचा धोका असल्यामुळे सुरक्षिततेसाठी तातडीने उपाययोजना करण्यात आल्या आहेत. अपघातस्थळी विशेष टीम पाठवून वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.अपघातामुळे मुंबईकडून साताऱ्याच्या दिशेने जाणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे.

वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यामुळे अनेक प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. वारजे पुलाजवळून पर्यायी मार्गांची व्यवस्था करण्यात आली असून, वाहनचालकांना पोलीस सूचना देत आहेत.
Comments
Add Comment