
यशस्वी जायसवालने २०६ बॉलमध्ये ८ चौकार आणि ३ षटकार ठोकत आपले शतक पूर्ण केले. त्याने आपला षटकार ठोकत शतकी सलामी दिली.
भारतीय संघाने गेल्या २ दौऱ्यांमध्ये ऑस्ट्रेलियाला त्यांच्यात घरात हरवले होते. यावेळेस हॅटट्रिकची संधी आहे. या महामालिकेत एकूण ५ सामने खेळवले जाणार आहेत. मालिकेतील पुढील कसोटी सामना ६ डिसेंबरला अॅडलेडमध्ये होणार आहे.
पर्थ कसोटीत भारतीय संघ दुसऱ्या डावात फलंदाजी करतआहे. दुसऱ्या दिवशी खेळ संपेपर्यंत भारतीय संघाने दुसऱ्या डावात कोणताही विकेट न गमावता १७२ धावा केल्या होत्या. आज दुसऱ्या डावात भारताला पहिला झटका केएलच्या रूपात बसला. त्याने ७७ धावा केल्या.