मुंबई: भारतातील EV दुचाकी उद्योगातील अग्रणी एथर एनर्जी लिमिटेडने रिलायन्स जनरल इन्शुरन्सशी सहयोग करून आपल्या एथर 450 सिरीज आणि रिझ्टा स्कूटर्ससाठी ‘एट७0TM वॉरंटी’ देऊ केली आहे. ही ‘एट७0TM वॉरंटी’ अनेक लाभ प्रदान करून बॅटरीचे दीर्घकालीन आरोग्य, परफॉर्मन्स आणि बदलण्याचा खर्च वगैरे ग्राहक समस्यांचे निराकरण करते.
‘एट70TM वॉरंटी’ चे मुख्य फायदे आहेत:
● ८ वर्षे किंवा ८0,000 किमी. यापैकी जे आधी होईल तोपर्यंत कव्हरेज
● ७0% बॅटरी हेल्थची हमी
● उत्पादनातील दोष आणि फेल्यूअर यांच्यासमोर पूर्ण कव्हरेज
● दाव्याच्या रकमेवर महत्तम मर्यादा नाही
● दीर्घ काळासाठी स्कूटर पडून राहिली असेल किंवा ती चार्ज केली नसेल तर बॅटरी सेलच्या सखोल डिस्चार्जमुळे दावा नाकारण्यात येणार नाही
एथर एनर्जीचे CEO तरुण मेहता यांनी एट७० TM वॉरंटीविषयी X (पूर्वीचे ट्विटर) वर काय सांगितले बघा-
या प्रसंगी बोलताना एथर एनर्जी लिमिटेडचे चीफ बिझनेस ऑफिसर रवनीत सिंह फोकेला म्हणाले, “EV खरेदीदारांसाठी बॅटरीचा टिकाउपणा हा महत्वाचा घटक असतो. आपल्या इलेक्ट्रिक स्कूटर्सच्या बॅटरीचे आयुष्यमान आणि बॅटरी बदलण्याच्या खर्चाबाबत ग्राहकांच्या चिंता आपण बऱ्याचदा ऐकतो. या समस्यांचा विचार करून आम्ही ही नवीन ‘एट७० TM वॉरंटी’ सुरू करत आहोत. ही वॉरंटी ८ वर्षांपर्यंत कमीत कमी ७० % बॅटरी हेल्थची हमी देते. आम्हाला आशा आहे की, ही वॉरंटी EV खरेदीदारांच्या मनातील त्यांच्या स्कूटर बॅटरीच्या दीर्घकालीन आरोग्याबाबतची काळजी दूर करेल.”
रिलायन्स जनरल इन्शुरन्सचे सीईओ श्री. राकेश जैन म्हणाले, “रिलायन्स जनरल इन्शुरन्समध्ये आम्ही ग्राहकांचे समाधान आणि मनःशांती वाढविणाऱ्या इनोव्हेशन्सला चालना देण्याबाबत वचनबद्ध आहोत. एथर सोबत आम्ही केलेल्या भागीदारीतून EV मालकांना दीर्घ काळ सुरक्षा प्रदान करण्याचे आमचे समान व्हिजन प्रतिबिंबित होते. आम्हाला खात्री आहे की, EV ईकोसिस्टममध्ये लोकांचा विश्वास वाढविण्यात आणि ही शाश्वत गतिशीलता अंगिकारण्यासाठी लोकांना प्रोत्साहन देण्यात ही वॉरंटी महत्त्वाची भूमिका बजावेल.”
एथरच्या बॅटरीजवर २७२ चाचण्या केल्या जातात. यामध्ये तापमान चाचणी, मेकॅनिकल ड्रॉप टेस्टिंग आणि आत्यंतिक कंपन चाचणीचा समावेश आहे. या चाचण्या बॅटरीचा टिकाऊपणा आणि सहनशीलता तसेच चालकाची सुरक्षितता सुनिश्चित करतात. एथरची इन-बिल्ट बॅटरी मॅनेजमेंट सिस्टम ही बॅटरी पॅकमधील सर्व सेल्सशी जोडलेली आहे आणि ती सतत त्यांचे व्होल्टेज आणि करंट मापत असते. या पॅकमध्ये ठिकठिकाणी बसवलेले टेंपरेचर सेन्सर्स बॅटरी पॅकच्या वेगवेगळ्या भागांमधील तपमानांची माहिती BMS ला पुरवीत असते. त्यामुळे बॅटरी पॅकमधील सेल सुरक्षित ऑपरेटिंग परिस्थितीत काम करत असल्याची खातरजमा होते.
एथरच्या दोन मुख्य प्रकारच्या स्कूटर्स आहेत – ४५० आणि रिझ्टा, ज्यांचे फायदे वेगवेगळ्या सेगमेन्टनुसार आहेत. या दोन्ही प्रकारच्या स्कूटर्ससाठी नवीन दाखल केलेल्या ‘एट70TM वॉरंटी’ सहित एथरचे विस्तारित बॅटरी वॉरंटी पर्याय उपलब्ध आहेत. एथरच्या ४५० लाइनच्या स्कूटर्समध्ये ४५०X, ४५०S आणि ४५० अपेक्स या परफॉर्मन्स सेगमेन्टमध्ये आहेत, तर एथरने अलीकडे, या वर्षाच्या सुरुवातीस लॉन्च केलेली रिझ्टा फॅमिली सेगमेन्टमधली गाडी आहे. ही बॅटरीसाठीची ‘एट७० TM वॉरंटी’ प्रो-पॅकवर मिळणाऱ्या ५-वर्षांच्या बॅटरी वॉरंटीच्या अतिरिक्त 3-वर्षे अॅड-ऑन म्हणून विकत घेता येते. एथर ४५० -सिरीज आणि एथर रिझ्टाच्या ज्या खरेदीदारांनी प्रो-पॅक घेतले आहे, त्यांच्यासाठी या वॉरंटीची किंमत GST सकट ४,९९९ रु. आहे.