मुंबई: राज्यात एकीकडे विधानसभा निवडणुकीसाठी(assembly election 2024) मतमोजणी होत आहे. दुसरीकडे केरळच्या वायनाड लोकसभा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीचीही मतमोजणी होत आहे. सकाळी ८ वाजल्यापासून या मतमोजणीला सुरूवात झाली आहे. दरम्यान, वायनाड येथील मतदारसंघाचा गड काँग्रेस राखणार की नवीन उमेदवार निवडून येणार हे समजणार आहे.
वायनाड लोकसभा मतदारसंघात आतापर्यंतच्या तीनही निवडणुकांमध्ये काँग्रेसने विजय मिळवला आहे. त्यामुळे काँग्रेसच्या गड राखण्यास प्रियंका गांधींना यश मिळणार की नाही हे आजच्या मतमोजणीवरून समजेल.
सध्या प्रियंका गांधी तब्बल दीड लाख मताधिक्यांनी आघाडीवर आहेत. या ठिकाणी १३ नोव्हेंबरला मतदान झाले होते. यावेळी ६४.२४ टक्के मतदान झाले होते. २००९च्यानंतर सर्वात कमी मतदान येथे झाले होते.