
मुंबई : विधानसभा निवडणूकीत मुंबईमध्ये महायुतीचं निर्विवाद वर्चस्व दिसून आलं आहे. मुंबई शहर आणि उपनगर या दोन्ही जिल्हयातल्या मिळून एकूण ३६ जागांपैकी २४ जागांवर महायुतीनं आघाडी घेतली आहे. त्यातही मुंबई उपनगर विधानसभा मतदारसंघात २६ पैकी २० जागा मिळवत महायुतीनं घवघवीत यश मिळवलं तर मुंबई शहरातल्या १० पैकी ४ जागा महायुतीनं जिंकल्या आहेत.
मुंबईत भाजपाला सर्वाधिक १५, शिवसेनेला ६, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला १०, काँग्रेसला ३ तर राष्ट्रवादी काँग्रेसला एका जागेवर यश मिळालं आहे. एका जागी अपक्ष उमेदवार निवडून आला आहे. भाजपाचे मंगलप्रभात लोढा, राहुल नार्वेकर, विद्या ठाकूर, संजय उपाध्याय विजयी झाले आहेत. तर वरळीतून आदित्य ठाकरे विजयी झाले तर, वांद्रे पूर्व इथुन वरुण सरदेसाई विजयी झालेत. वांद्रे पश्चिममधुन आशिष शेलार विजयी झाले आहेत.

मुंबई : महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणूकीचे निकाल धक्कादायक लागले असून या निकालामध्ये महायुतीचे वारु सुस्साट सुटल्याने ...
माहिममधुन महेश सावंत विजयी झाले आहेत, मनसेच्या अमित ठाकरे यांचा पराभव झाला आहे. अणुशक्तीनगर इथुन सना मलिक तर मानखुर्द शिवाजीनगर इथुन समाजवादी पक्षाचे अबु आझमी विजयी झाले आहेत. विक्रोळी मतदारंसघातून सुनिल राऊत विजयी झाले आहेत.