Monday, February 10, 2025
Homeताज्या घडामोडीविकासकामांना जनतेने पोचपावती दिल्याने महायुतीचा दणदणीत विजय

विकासकामांना जनतेने पोचपावती दिल्याने महायुतीचा दणदणीत विजय

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह उपमुख्यमंत्री फडणवीसांनी मानले आभार

मुंबई : विधानसभा निवडणूक निकालात महायुतीने जोरदार प्रदर्शन केले आहे. दोऩशे जागा महायुतीने जिंकल्या आहेत. त्यामुळे हा महाविकास आघाडीसाठी मोठा धक्का मानला जात आहे. या विजयानंतर महायुतीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष सुरू केला आहे. कुठे मिठाई वाटत, तर कुठे ढोल-ताशे वाजवत कार्यकर्ते आनंद साजरा करत आहेत. या निकालावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली.

‘राज्यात लाडकी बहीण, लाडके भाऊ, लाडके शेतकरी यांच्यामुळे आमचा विजय होत आहे. मुख्यमंत्रिपदाबाबत बोलताना ते म्हणाले, आम्ही केलेल्या विकासकामांची जनतेने पोचपावती दिली. या विजयामुळे पुढील काळात आमची जबाबदारी वाढणार आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीचा दणदणीत विजय झाला आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

Maharashtra assembly : महाराष्ट्र विधानसभा मतदारसंघ निहाय निकाल

राज्यातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्याच्या हेतुने ‘लाडकी बहीण योजने’ची घोषणा महायुती सरकारने केली होती. या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांच्या खात्यात दरमहा १५०० रुपये जमा करण्याची तरतूद करण्यात आली होती. आतापर्यंत अनेक महिलांना या योजनेचा लाभ मिळाला. या योजनेचा जोरदार प्रचार हा महायुतीतील पक्षांनी केला होता. सत्ता आल्यावर या योजनेच्या रक्कमेत वाढ करण्याचे आश्वासनही महायुती सरकारने दिले होते. आता याच योजनेचा फायदा विधानसभा निवडणुकीत झाल्याचे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडक्या बहिणींचे आभार मानले.

मतदारांपुढे महायुती नतमस्तक

विधानसभेत महायुतीचा ऐतिहासिक विजय झाला आहे. आतापर्यंतच्या अनेक वर्षांचा निवडणुका आपण पाहिल्या, मात्र अशा पद्धतीने लोकांनी हातात घेतलेली निवडणूक आपण पाहिली नसल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. महाराष्ट्रासाठी आजचा दिवस ऐतिहासिक असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. लाडक्या बहिणी असेल, लाडके भाऊ असतील किंवा लाडके शेतकरी असतील या सर्वांनी महायुतीवर मनापासून प्रेम दाखवले आहे. त्या सर्वांचे आभार मानताना या ऐतिहासिक विषयासाठी सर्वांना दंडवत घातला पाहिजे, अशा शब्दात मतदारांचे आभार देखील शिंदे यांनी मानले.

जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही – फडणवीस

महाराष्ट्राच्या जनतेसमोर महायुती नतमस्तक असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. महायुतीवर महाराष्ट्राने दाखवलेला हा विश्वास आहे. त्यामुळे आम्हाला आता मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात काम करावे लागणार असल्याची जाणीव होत असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. म्हटले आहे. इतकेच नाही तर त्यांना मतदारांना आश्वस्त करतो की, जनतेने आमच्यावर जो विश्वास दाखवला आहे, त्याला आम्ही तडा जाऊ देणार नसल्याचे फडणवीस यांनी म्हटले आहे. आमची जबाबदारी वाढवणारा हा विजय असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -