नवी दिल्ली: झारखंडमध्ये सुरूवातीच्या कलांमध्ये झारखंड मुक्ती मोर्चा पक्ष आघाडीवर दिसत आहे. येथे बोरियो येथून जेएमएमचे उमेदवार आघाडीवर आहेत. सुरूवातीच्या कलांमध्ये राजधानी रांची येथून जेएमएमचे उमेदवार महुआ माझी आघाडीवर आहेत.
झारखंडमध्ये आज विधानसभेसाठी(Jharkhand Election Results २०२४) मतमोजणी थोड्या वेळात सुरू होत आहे. येथे आधी पोस्टल बॅलेटचे मतदान होणार आहे. यानंतर साडेआठ वाजता ईव्हीएममध्ये नोंद झालेल्या मतांची मोजणी होणार आहे. पहिल्या फेरीच्या मतमोजणीचा निकाल साडेनऊ वाजेपर्यंत येण्याची शक्यता आहे. सर्व ८१ विधानसभा जागांसाठीच्या मतमोजणीसाठी कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आले आहेत. झारखंडमध्ये एनडीए विरुद्ध इंडिया गठबंधन यांच्यातील सामन्यात कोण कोणाला मात देणार हे आज स्पष्ट होईल.
झारखंडमध्ये ६७.७४ टक्के मतदान झाले आहे. मतदानाच्या तुलनेत महिलांनी पुरुषांना मागे टाकले. महाराष्ट्राप्रमाणेच महिलांनी यावेळी अधिक मतदान केले. १,७६,८१, ००७ मतदांरांनी आपल्या मतदानाचा अधिकार बजावला. झारखंडमध्ये २८ जागा अनुसूचित जातीजमातींसाठी राखीव आहेत.
झारखंडच्या हॉट सीट
मुख्यमंत्री हेमंत सोरेन बरहेट येथून निवडणूक लढवत आहेत. हा त्यांचा गड मानला जातो. माजी मुख्यमंत्री बाबूलाल मरांडी धनवार येथून निवडणूक लढवत आहेत. माजी मुख्यमंत्री चंपाई सोरेन यांनी आपला परंपरागत मतदारसंघ सरायकेला येथून भाजपकडून निवडणूक लढवली आहे. माजी मुख्यमंत्री मधु कोडा यांच्या पत्नी गीता कोडा जगन्नाथपूर येथून मैदानात उतरल्या आहे. हेमंत सोरेन यांची पत्नी कल्पना सोरेन गांडेय येथून निवडणुकीच्या रिंगणात आहे. जमशेदपूर पूर्व मतदारसंघातून माजी मुख्यमंत्री रघुबर दास यांची सून रिंगणात उतरल्या आहेत. तर जमशेदपूर पश्चिम मतदारसंघातून सरयू राय मैदानात आहेत.
बाबूलाल मरांडी यांना बहुमताचा विश्वास
मतमोजणीआधी झारखंडचे भाजप अध्यक्ष बाबूलाल मरांडी यांनी म्हटले की सरकारबाबत आम्ही आश्वस्त आहोत. झारखंडमध्ये यावेळेस ५१हून अधिक जागा येथील आणि एनडीचे सरकार बनेल.