मुंबई: झारखंडमध्ये(Jharkhand Election Result 2024) पुन्हा एकदा हेमंत सोरेन सरकार बनताना दिसत आहे. मतमोजणीच्या आकड्यांनुसार झारखंड इंडिया आघाडी ५१ जागांवर आघाडीवर आहे. तर एनडीएला २८ जागांवर आघाडी मिळताना दिसत आहे. तर इतर २ जागांवर आघाडीवर आहे. यावेळेस पुन्हा झारखंडमध्ये जेएमएमचे सरकार बनत असेल तर असे पहिल्यांदाच होईल की झारखंडमध्ये एखाद्या सरकारने दुसऱ्यांदा सरकार बनवले.
निवडणूक आयोगानुसार झारखंड मुक्ती मोर्चा म्हणजेच जेएमएम ३० जागांवर आघाडीवर आहे. तर भाजप दुसऱ्या स्थानावर २६ जागांसह आहे. सर्वच जागांवर काँटे की टक्कर सुरू आहे. अशातच सर्वांच्या निवडणुका निकालावर आहेत. काही तासांतच हे स्पष्ट होईल की कोणता पक्ष झारखंडमध्ये सरकार बनवणार आहे. मात्र आतापर्यंतच्या आकड्यांवरून असे वाटत आहे की झारखंडमध्ये पुन्हा हेमंत सोरेन सरकार बनत आहे.
झारखंडच्या ८१ जागांवर दोन टप्प्यात मतदान पार पडले होते. पहिल्या टप्प्यातील मतदान १३ नोव्हेंबर आणि दुसऱ्या टप्प्यातील मतदान २० नोव्हेंबरला झाले होते. दोन्ही टप्प्यात ६६ टक्केपेक्षा अधिक मतदान झाले होते. यावेळेस ही निवडणूक इंडिया आघाडी आणि एनडीए यांच्यात आहे.