मुंबई: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या(Ind vs Aus) पहिल्या कसोटी सामन्यात जसप्रीत बुमराह चांगलाच चमकला. बुमराहने पहिल्या कसोटीत तब्बल पाच विकेट घेत ऑस्ट्रेलियाची दाणादाण उडवली.
दुसऱ्याच दिवसाच्या सुरूवातीला ऑस्ट्रेलियाचा डाव अवघ्या १०४ धावांवर आटोपला. पहिल्या डावातील धावसंख्येसह आता भारतीय संघ आघाडीवर आहे.
पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारताचा डाव ७ बाद ६७ इतका होता. यातही बुमराहने कमाल केली होती. त्यानंतर आज सकाळी ७.५०ला सामन्याला सुरूवात झाली.
त्यानंतर जसप्रीत बुमराहने आक्रमक पवित्रा घेतला. बुमराहने ३० धावांत ५ विकेट घेतल्या. तर मोहम्मद सिराजने २० विकेट घेतल्या. तर हर्षित राणाने पदार्पणात जबरदस्त कामगिरी करताना ३ विकेट घेतल्या.