Monday, February 10, 2025
HomeगॅलरीElection Results 2024: स्वरा भास्करचे पती फहाद यांचा पराभव

Election Results 2024: स्वरा भास्करचे पती फहाद यांचा पराभव

मुंबई: महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीची मतमोजणी आज पार पडत आहे. सकाळी आठ वाजल्यापासून याची सुरूवात झाली आहे. दोन्ही राज्यांच्या विजयी उमेदवारांची नावे समोर आली आहे.

यात अनेक विधानसभा मतदारसंघांमध्ये आपल्या प्रतिस्पर्ध्यांना हरवत शानदार विजय मिळवला आहे. यातील अनेक लोकांची अशी नावे आहेत जे विविध पक्षांकडून निवडणुकीच्या मैदानात आपले नशीब आजमवण्यासाठी उतरले होते.

यातच अणुशक्ती नगर विधानसभा मतदारसंघ होता ज्यावर अनेकांच्या नजरा टिकून होत्या. या मतदारसंघातून बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर यांचे पती फाहद अहमद निवडणुकीच्या मैदानात होते. तेथे त्यांची टक्कर नॅशनलिस्ट काँग्रेस पक्षाच्या सना मलिक यांच्याशी होती. यात त्यांचा मोठा पराभव मिळाला.

अशातच अभिनेत्रीला आपल्या पतीचा पराभव पचलेला नाही. तिने ईव्हीएमवर सवाल उपस्थित केले आहेत. सोबतच निवडणूक आयोगाकडून उत्तरही मागितले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -