Friday, May 9, 2025

देशताज्या घडामोडी

Bypoll Results: बंगालमध्ये ममताच बॉस, बिहारमध्ये आरजेडीचा सुपडा साफ, उत्तर प्रदेशात सायकलवर कमळ भारी

Bypoll Results: बंगालमध्ये ममताच बॉस, बिहारमध्ये आरजेडीचा सुपडा साफ, उत्तर प्रदेशात सायकलवर कमळ भारी

मुंबई: उत्तर प्रदेशातील ९, बिहारच्या ४, आसाममधील ५, पश्चिम बंगालच्या ६, राजस्थानच्या ७, सिक्कीम, केरळ आणि मध्य प्रदेशातील २-२, मेघालय-उत्तराखंडच्या १-१ जागांवर पोटनिवडणुकीचे निकाल हाती येत आहेत.


पंजाबच्या पोटनिवडणुकीत चार जागांपैकी तीन जागांवर आम आदमी पक्षाने आघाडी घेतली आहे. गिद्दडबाबा, डेराबाब नानक, चब्बेवाल जागांवर आम आदमी पक्षाच्या उमेदवारांनी चांगली आघाडी घेतली आहे.


मध्य प्रदेशच्या बुधनी आणि विजयपूर मतदारसंघातून भाजपचे उमेदवार पुढे आहेत. बुधनी मतदारसंघातून भाजपचे रामनिवास रावत आघाडीवर आहेत तर विजयपूर येथून रमाकांत भार्गव आघाडीवर आहेत.



कर्नाटकमध्ये काँग्रेस आघाडीवर


कर्नाटकमधील सर्व तीन जागांवर काँग्रेसचे उमेदवार आघाडीवर आहेत. चन्नपटना, शिगगाव, संदूरमध्ये काँग्रेसने चांगली आघाडी घेत विजयाचा रस्ता साफ केला आहे.

Comments
Add Comment