Ravisheth Patil : पेणमध्ये भाजपाचे कमळ फूलले; रविशेठ पाटील यांचा विक्रमी मतांनी विजय

पेण : पेण-सुधागड-रोहा विधानसभा मतदार संघात पुन्हा एकदा भाजपाचे कमळ फुलले आहे. या निवडणुकीत महायुतीचे भारतिय जनता पार्टीचे उमेदवार आमदार रविशेठ पाटील (Ravisheth Patil) यांनी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार प्रसाद भोईर यांचा तब्बल ६० हजार ८१० इतक्या मोठ्या मताधिक्क्यांनी पराभव करुन रविशेठ पाटील यांनी दुस-यांदा भाजपच्या तिकीटावर विजय मिळविला आहे. भाजपचे रविशेठ पाटील यांना १ लाख २४ हजार ६३१ मते मिळाली. तर शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रसाद भोईर यांना ६३ हजार ८२१ मते मिळाली. तर शेतकरी कामगार पक्षाचे अतुल म्हात्रे यांना २८ हजार १९१ मते मिळाली.


पेण विधानसभा मतदारसंघात ७ उमेदवार आपले नशीब आजमावत होते. यात भाजप, शेकाप, शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे, वंचित बहुजन आघाडी, बसपा आणि अपक्ष असे ७ उमेदवार उभे होते. यामध्ये मुख्य लढत ही भाजपचे विद्यमान आमदार रविशेठ पाटील, शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार प्रसाद भोईर, शेतकरी कामगार पक्षाचे अतुल म्हात्रे यांच्यात होती.


पेण विधानसभा मतदार संघाचे मतमोजणी आज पेण येथील के.इ.एस इंग्लिश स्कुल मध्ये कडेकोट बंदोबस्त मध्ये पार पडली. मतमोजणीच्या पहिल्या फेरी पासूनच महायुतीचे भाजपचे उमेदवार रविशेठ पाटील यांनी आघाडी घेतली होती. ही आघाडी शेवटच्या २९ वी फेरी पर्यंत वाढतच गेली. मतदार संघातील पेण, पाली, सुधागड, नागोठणे, रोहा या विभागात देखील जनतेने रविशेठ पाटील यांना कौल दिला.


महायुतीचा नियोजन बद्ध प्रचार व केलेली विकास कामे या जोरावर रविशेठ पाटील यांनी हा विजय मिळविला आहे. पेण मतदार संघात महाविकास आघाडीत पडलेली फुट, या मतदार संघात ७१ टक्के झालेला मतदान व वाढलेला मतदानाचा टक्का याचा भाजपला फायदा झाल्याचे चित्र दिसत आहे. भाजप च्या लाडकी बहीण व विकासाच्या मुद्द्याला जनतेने कौल दिला असल्याचे आजच्या निकालाने स्पष्ट झाले आहे.


मतमोजणी पूर्ण होताच महायुतीच्या उत्साही कार्यकर्त्यांकडून ढोल ताश्याच्या गजरात पेण शहरातून मिरवणूक काढण्यात आली. यावेळी खासदार धैर्यशील पाटील, कौसल्या पाटील, जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील, नीलिमा पाटील, प्रभाकर म्हात्रे, डीबी पाटील, मिलिंद पाटील, अनिरुद्ध पाटील, निवृत्ती पाटील, विवेक जोशी, मंगेश दळवी आदी सहभागी झाले होते.



पेण विधानसभा मतदार संघातील उमेदवारांना पडलेली मते


रविशेठ पाटील (भाजप) १,२४,६३१ (विजयी)


प्रसाद भोईर (शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे) ६३,८२१.


अतुल म्हात्रे (शेतकरी कामगार पक्ष) २९,१९१.


मंगळ पाटील (अभिनव भारत पार्टी) २२६६.


देवेंद्र कोळी (वंचित बहुजण आघाडी) १७०१.


अनुजा साळवी (बहुजन समाज पार्टी) १२४१.


विकास बागुळ (अपक्ष) १२०३.


नोटा २४७३.

Comments
Add Comment

महेश मांजरेकर याचं तब्बल २९ वर्षांनी रंगभूमीवर पुनरागमन; 'या' नाटकात करणार काम

मुंबई : मराठी रंगभूमीवर पुन्हा एकदा हास्य आणि भावनांचा संगम घेऊन ‘शंकर जयकिशन’ हे नाटक रसिकांच्या भेटीला येत आहे.

खेळताना ट्रॅक्टरवर चढला, चुकून गिअर पडला अन् ; बार्शीत ४ वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील शेळगावमध्ये गुरुवारी दुपारी ४ वर्षांच्या मुलाचा ट्रॅक्टरसह

युएस एफडीएकडून आलेल्या निकालानंतर ग्लेनमार्क फार्मा शेअरला गुंतवणूकदारांचा तुल्यबळ प्रतिसाद, २% शेअर उसळला

मोहित सोमण:ग्लेनमार्क फार्मा या भारतातील मोठ्या फार्मा कंपनीच्या शेअर्समध्ये आज चांगली वाढ झाली आहे. सत्र

आंतरराष्ट्रीय लोकशाही आणि निवडणूक सहाय्यता संस्थेच्या अध्यक्षपदाची सूत्रे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याकडे

मुंबई  : भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार २०२६ या वर्षासाठी आंतरराष्ट्रीय लोकशाही आणि निवडणूक

मुंबई-गोवा महामार्गावर माणगाव येथे धुक्यामुळे भीषण अपघात

शिवशाही बस, ट्रकमध्ये धडक; १ ठार, ११ जखमी प्रमोद जाधव माणगाव : मुंबई-गोवा महामार्गावर अपघातांची मालिका सुरू आहे.

येत्या ३ आणि ४ डिसेंबरला अर्ध्या मुंबईत १५ टक्के पाणीकपात

मुंबई : भांडुप जलशुद्धीकरण केंद्रास पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी बदलण्याचे काम हाती घेण्यात आले असल्याने