Tuesday, February 11, 2025
Homeताज्या घडामोडीAjit Pawar : राज्यातील समस्त जनतेचे अजित पवार यांनी मानले मनापासून आभार

Ajit Pawar : राज्यातील समस्त जनतेचे अजित पवार यांनी मानले मनापासून आभार

महायुतीला मिळालेले यश म्हणजे महायुती सरकारने केलेल्या विकासकार्यावरील जनतेच्या विश्वासाचे प्रतिक

‘लाडकी बहिण’सारख्या योजनांना लाभार्थींपर्यंत पोहोचवण्यासाठी राबणारे लाखो कार्यकर्ते तसेच शासनाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनाही दिले यशाचे श्रेय

मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुतीला मिळालेले अभूतपूर्व यश हे राज्यातील जनतेने महायुतीच्या विकासकामे तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या सक्षम नेतृत्वावर व्यक्त केलेल्या विश्वासाचे प्रतिक आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह महायुतीच्या प्रत्येक लोकप्रतिनिधी, कार्यकर्त्यानी गेल्या अडीच वर्षात केलेल्या कष्टातून आज हे यश मिळाले आहे. महायुती सरकारने आणलेल्या ‘लाडकी बहिण’सारख्या अनेक योजनांना लाभार्थींपर्यंत पोहोचवण्यासाठी महायुतीचे लाखो कार्यकर्ते राबले तसेच शासनाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनीही मनापासून काम केले, त्या सर्वांना या यशाचे श्रेय जाते. महायुतीच्या उमेदवारांना मतदारांनी आमच्या अपेक्षेपेक्षा कितीतरी अधिक भरभरुन मतदान केले. राज्यातल्या समस्त जनतेने विश्वासाने एकमुखी पाठिंबा दिला. या सर्व मतदारांचे, नागरिकांचे अजित पवार (Ajit Pawar) यांनी मनापासून आभार मानले.

जनतेच्या आशा, अपेक्षा, आकांक्षा पूर्ण करण्यासाठी, शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव, कष्टाला मोल देण्यासाठी, युवकांना रोजगार, स्वयंरोजगाराची संधी देऊन स्वावलंबी बनवण्यासाठी, कृषी, उद्योग, व्यापार, शिक्षण, सहकार अशा सर्व क्षेत्रात महाराष्ट्राला पहिल्या क्रमांकाचे राज्य बनविण्यासाठी यापुढच्या काळात आम्ही सर्व मिळून काम करु. महाराष्ट्राच्या भल्यासाठी, सर्व समाजघटकांचे हित जपण्यासाठी जीवाचे रान करु असा विश्वास देत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महायुतीला मतदान करणाऱ्या सर्व मतदारांचे, राज्यातील समस्त जनतेचे मनापासून आभार मानले आहेत.

Maharashtra assembly election result 2024 : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक-२०२४ पक्षनिहाय कोणाला किती जागा – LIVE

पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह केंद्रसरकारचे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मावळत्या राज्य मंत्रीमंडळातील सर्व सहकाऱ्यांनी केलेल्या सहकार्याबद्दल त्यांना तसेच महायुतीच्या प्रत्येक कार्यकर्त्यांला यशाचे श्रेय देत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या सर्वांचेही विशेष आभार मानले आहेत.

विधानसभा निवडणुकीत महायुतीसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळालेल्या ऐतिहासिक यशामुळे राज्याच्याच नव्हे तर देशाच्या राजकीय पटावर नवा अध्याय लिहिला गेला आहे. या यशाचे सर्वाधिक श्रेय लाडक्या बहिणींना आहे. त्यांचे अजितदादा पवार यांनी विशेष आभार मानले.महायुतीचे विधानसभा निवडणुकीतील यश म्हणजे राज्यातील शेतकरी, कष्टकरी, माता-भगिनी, युवकांच्या विश्वासाची आणि एकजुटीची विजयगाथा आहे. महाराष्ट्रातील जनतेने दाखवलेल्या विश्वासामुळे महायुतीला अभूतपूर्व यश प्राप्त झाले आहे. हे फक्त निवडणुकीतील यश नसून राज्यातील जनतेच्या आशा-आकांक्षांचा विजय आहे. राज्यातील प्रत्येक घटकाने आम्हाला दिलेल्या पाठिंब्यामुळे महाराष्ट्राच्या विकासाला नवी दिशा मिळेल याची आम्हाला खात्री आहे. या सर्वांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही, असा शब्दही अजित पवार यांनी दिला.

Maharashtra assembly : महाराष्ट्र विधानसभा मतदारसंघ निहाय निकाल – LIVE

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निवडणूक प्रचारादरम्यान मिळालेल्या जनतेच्या प्रतिसादाचे कौतुक केले आणि त्यांच्या भावनिक समर्थनाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक घटकातील जनतेने दिलेला पाठिंबा हा आमच्यासाठी मोठे बळ आहे. राज्यातील जनतेच्या विश्वासाला पात्र ठरण्यासाठी आम्ही सतत प्रयत्नशील राहू. हा केवळ महायुतीचा राजकीय विजय नसून राज्यातील शेतकरी, कष्टकरी, युवा, महिला, कामगार, उद्योजक आणि वंचित घटकांच्या इच्छा आणि आकांक्षांचा विजय आहे. या विजयामुळे आमची जबाबदारी अधिक वाढली आहे. महाराष्ट्राच्या प्रत्येक घटकाला न्याय देणारे, शाश्वत आणि सर्वसमावेशक विकासाला प्राधान्य देणारे धोरण आखणे आणि ते अंमलात आणणे हा आमचा निर्धार आहे.महायुतीतील सहकारी मित्र पक्षांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. महायुतीतील प्रत्येक पक्षाने प्रचंड मेहनत घेऊन आपले कर्तव्य बजावले. हे यश या सर्व घटकांच्या एकजुटीचे फलित आहे. या सहकार्यामुळे महाराष्ट्राच्या प्रगतीची नवी दारे उघडली जातील. महायुती सरकारच्यावतीने तयार करण्यात आलेल्या विविध लोकोपयोगी योजनांची यशस्वीपणे अंमलबजावणी करणाऱ्या राज्यसरकारमधील सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांचे सुद्धा यानिमित्ताने आभार अजित पवार यांनी मानले.

महाराष्ट्राच्या उज्ज्वल भवितव्यासाठी व्यापक योजना राबविण्याचा महायुतीचा संकल्प असून आता आम्ही महाराष्ट्राला प्रत्येक क्षेत्रात देशातील अग्रगण्य राज्य बनवण्यासाठी झटणार आहोत. विकास, रोजगार, कृषी सुधारणा, शिक्षण, आरोग्य या सर्व क्षेत्रांमध्ये प्रगती करण्याचे आमचे ध्येय आहे. महाराष्ट्रातील जनतेने महायुतीवर दाखवलेल्या विश्वासाला तडा जाऊ नये, यासाठी महायुतीचा प्रत्येक घटक पूर्ण निष्ठेने काम करेल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य देत, त्यांना केंद्रस्थानी ठेवून प्रत्येक धोरण आखले जाईल, असेही अजित पवार यांनी ठामपणे सांगितले.

राज्याच्या यशस्वी वाटचालीत जनतेच्या सहभागाला महत्त्वाचे स्थान आहे. राज्यातील प्रत्येक घटकाने दाखवलेल्या विश्वासाने आम्हाला मोठी जबाबदारी दिली आहे. आता आपल्या अपेक्षांना साजेसे काम करत महाराष्ट्राला प्रगतिपथावर नेण्याचे आमचे प्राधान्य राहील, असे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील जनतेचे मनःपूर्वक आभार मानले आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -