मुंबई: केंद्र सरकारच्या पेन्शनर्ससाठी महत्त्वाची आहे. जर तुम्ही दरवर्षी जमा करावे लागणारे जीवन प्रमाणपत्र(Life certificate) अजूनपर्यंत सादर केले नसेल तर आणखी फक्त ९ दिवस बाकी राहिले आहेत. ३० नोव्हेंबर २०२४ च्या आधी तुमचे जीवन प्रमाणपत्र सादर करा. नाहीतर तुम्हाला मिळणारी पेन्शन बंद होऊ शकते. तसेच त्याचे फायदेही बंद होतील.
८० वर्षांपेक्षा अधिक वयाचे पेन्शनधारक १ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबरपर्यत जीवन प्रमाणपत्र सादर करू शकतात तर दुसरे पेन्शनधारक १ नोव्हेंबर २०२४ ते ३० नोव्हेंबरपर्यंत जीवन प्रमाणपत्र सादर करू शकतात.
कधीपर्यंत जमा करण्याची मुदत
नोव्हेंबरचा महिना पेन्शनधारकांसाठी खूप महत्त्वाचा असतो. पेन्शन मिळवणाऱ्या पेन्शनधारकांनी ३० नोव्हेंबरपर्यंत जीवन प्रमाणपत्र सादर करणे गरजेचे असते. यामुळे त्यांना पेन्शन मिळणे कायम राहते. हे जीवन प्रमाणपत्र एका वर्षासाठी वैध असते. गेल्या वर्षी ज्यांनी जीवन प्रमाणपत्र सादर केले होते ते ३० नोव्हेंबर २०२४ पर्यंत वैध होते. अशातच डिसेंबर महिन्यापासून पेन्शन मिळवण्यासाठी ३० नोव्हेंबरपर्यंत जीवन प्रमाणपत्र सादर करणे गरजेचे असते.
८० वर्षांपेक्षा अधिक वयाच्या लोकांसाठी जीवन प्रमाणपत्र(Life certificate) सादर करण्याची सुविधा १ ऑक्टोबर पासून ते ३० नोव्हेंबर २०२४ पर्यंत आहे. तर ६० वर्षापेक्षा अधिक वयाचे वरिष्ठ नाpepepemगरिक १ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबरपर्यंत जीवन प्रमाणपत्र सादर करू शकतात.