नवी दिल्ली: जॅग्वार ही कंपनी लक्झरी कारसाठी ओळखली जाते. १०२ वर्ष जुनी असलेल्या या वाहन कंपनीने नव्या लोगोचे अनावरण केले आहे. त्यांच्या ह्या निर्णयावर मात्र नेटकरी नाराज असल्याचे चित्र दिसते आहे.
जॅग्वार कंपनी त्यांच्या सीडान आणि महागड्या कारसाठी खूप प्रसिद्ध आहे. जगभरात जॅग्वार कारचे चाहते आहेत. आत्तापर्यंत कंपनीने जगभरात विविध प्रकारचे मॉडल जारी केले आहेत. आता कंपनी २०२६ साली संपूर्णपणे इलेक्ट्रिक कार निर्माता म्हणून बाजारात उतरण्याची तयारी करत आहेत. त्यामुळंच कंपनीने त्यांचा आयकॉनिक लोगो बदलला आहे. जॅग्वार आता इलेक्ट्रिक कारवर फोकस करेल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.