Sunday, October 26, 2025
Happy Diwali

IND vs AUS: भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात आजपासून रंगणार पहिली कसोटी

IND vs AUS: भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात आजपासून रंगणार पहिली कसोटी

मुंबई: भारत आणि ऑस्ट्रेलिया(IND vs AUS) यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना पर्थमध्ये खेळवला जात आहे. टीम इंडिया ऑस्ट्रेलियाच पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये पोहोचण्याच्या दृष्टीने ही मालिका अतिशय महत्त्वाची आहे. भारतीय वेळेनुसार हा सामना ७.५० मिनिटांनी सुरू होईल.

टीम इंडिया जसप्रीत बुमराहच्या नेतृत्वात मैदानात उतरणार आहे. रोहित शर्मा या सामन्यात खेळणार नाही. भारतीय संघासमोर या सामन्यात नक्कीच मोठे आव्हान असणार आहे. अनुभवी खेळाडू शुभमन गिल सामन्यातून बाहेर आहे. रोहित आणि गिलच्या अनुपस्थितीत देवदत्त पड्डिकलला संघात स्थान मिळाले आहे. टीम इंडियाच्या प्लेईंग ११ मध्ये हर्षित राणाचाही समावेश होऊ शकतो.

भारत आणि ऑस्ट्रेलियाचे संभाव्य प्लेईंग ११

भारत : यशस्वी जयसवाल, केएल राहुल, देवदत्त पडिक्कल, विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), ध्रुव जुरेल, नितीश कुमार रेड्डी, रविचंद्रन अश्विन, प्रसिद्ध कृष्णा, जसप्रीत बुमराह (कर्णधार), मोहम्मद सिराज/हर्षित राणा

ऑस्ट्रेलिया : उस्मान ख्वाजा, नाथन मॅकस्वीनी, मार्नस लाबुशेन, स्टीव स्मिथ, ट्रॅविस हेड, मिशेल मार्श, एलेक्स कॅरी (विकेटकीपर), मिशेल स्टार्क, पॅट कमिंस (कर्णधार), नाथन लायन, जोश हेजलवुड

भारतीय संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा

२२-२६ नोव्हेंबर - पहिली कसोटी, पर्थ ६-१० डिसेंबर - दुसरी कसोटी, एडिलेड १४-१८ डिसेंबर - तिसरी कसोटी, ब्रिस्बेन २६-३० डिसेंबर - चौथी कसोटी, मेलबर्न ३ ते ७ जानेवारी - पाचवी कसोटी, सिडनी

Comments
Add Comment