Friday, May 9, 2025

क्रीडाताज्या घडामोडी

IND vs AUS: जसप्रीत बुमराहने एकट्याने तोडले कांगारूंचे कंबरडे

IND vs AUS: जसप्रीत बुमराहने एकट्याने तोडले कांगारूंचे कंबरडे

मुंबई: जसप्रीत बुमराहने पर्थमध्ये खेळवल्या जाणाऱ्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या(IND vs AUS) पहिल्या कसोटीत ऑस्ट्रेलियन फलंदाजांचे कंबरडे मोडले. दिवस संपेपर्यंत ऑस्ट्रेलियाने ७ विकेट गमावले. यात ४ विकेट बुमराहच्या नावावर होते. या विकेटसह बुमराहने असा रेकॉर्ड कायम केले. याआधी केवळ एका गोलंदाजाने हा रेकॉर्ड केला. म्हणजेच बुमराह असे करणारा जगातील दुसरा गोलंदाज ठरला आहे.


खरंतर, बुमराहने ऑस्ट्रेलियाचे दिग्गज फलंदाज स्टीव्ह स्मिथला गोल्डन डकवर पॅव्हेलियनमध्ये पाठवले. याआधी केवळ दक्षिण आफ्रिकेचा माजी दिग्गज वेगवान गोलंदाज डेल स्टेनने स्टीव्ह स्मिथला कसोटीत गोल्डन डकवर बाद केले होते. आता बुमराहचे नावही या यादीत सामील केले आहे. स्टीव्ह स्मिथचे घरच्या मैदानावर पहिला गोल्डन डक होता. दोन्ही गोलंदाजांनी स्मिथला एलबीडब्लूच्या माध्यमातून गोल्डन डकवर पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.



बुमराहने मिळवले सलग दोन विकेट


बुमराहने सलग दोन फलंदाजांना बाद केले. त्याने उस्मान ख्वाजाला पॅव्हेलियनमध्ये परतवले. त्यानंतर पुढच्याच बॉलवर बुमराहने स्टीव्ह स्मिथला गोल्डन डकवर पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. बुमराहने ख्वाजाला कॅचच्या माध्यमातून आणि स्मिथला एलबीडब्लूच्या माध्यमातून पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.

Comments
Add Comment