Tuesday, May 13, 2025

देश

ICA: आयसीए ग्लोबल को-ऑपरेटिव्ह कॉन्फरन्स २५ नोव्हेंबरपासून; पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन

ICA: आयसीए ग्लोबल को-ऑपरेटिव्ह कॉन्फरन्स २५ नोव्हेंबरपासून; पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन

मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी २०२५ चे संयुक्त राष्ट्र आंतरराष्ट्रीय सहकारी वर्ष लाँच करतील, अशी घोषणा भारत सरकारच्या सहकार मंत्रालयाची इफको लिमिटेड आणि आंतरराष्ट्रीय सहकारी संघटना यांच्या संयुक्त पत्रकार परिषदेत करण्यात आली. आंतरराष्ट्रीय सहकारी आघाडीच्या (आयसीए) १३० वर्षांच्या इतिहासात इफकोच्या पुढाकाराने या जागतिक सहकार चळवळीच्या आयसीए महासभेचे आणि जागतिक सहकारी परिषदेचे आयोजन प्रथमच भारतात करण्यात आले आहे.



भारत सरकारच्या सहकार मंत्रालयाचे सचिव डॉ. आशिष कुमार भूटानी यांनी सांगितले की, केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह २५ नोव्हेंबर २०२४ रोजी दुपारी ३ वाजता या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. ते जागतिक सहकारी परिषदेच्या उद्घाटन सत्राचे अध्यक्ष आणि मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहतील. या कार्यक्रमात आंतरराष्ट्रीय सहकारी वर्षा - २०२५ निमित्त स्मरणीय टपाल तिकिटाचे अनावरणही करण्यात येईल. इफको लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. यू. एस. अवस्थी यांनी पत्रकारांना माहिती दिली की, भूतानचे पंतप्रधान महामहिम दशो त्शेरिंग तोबगे जी आणि फिजीचे उपपंतप्रधान महामहिम मानोआ कामिकामिका हेही या कार्यक्रमाला मान्यवर पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. त्यांनी पत्रकारांना सांगितले की, हा कार्यक्रम २५ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर २०१४ या कालावधीत भारत मंडपम, आयटीपीओ, प्रगती मैदान, नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आला आहे. ‘सहकारी संस्था सर्वांसाठी समृद्धी निर्माण करतात’ ही या कार्यक्रमाची संकल्पना आहे.

इफको लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. यू. एस. अवस्थी म्हणाले, “सहकारी संस्था सर्वांसाठी समृद्धी निर्माण करतात, ही या परिषदेची संकल्पना आहे. एक समृद्ध आणि सुरक्षित सहकारी चळवळ उभारणे, हे आमचे दीर्घकालीन उद्दिष्ट आहे. विचारांच्या देवाणघेवाणीसाठी आंतरराष्ट्रीय अभ्यागतांचे स्वागत करता येणे हा आम्ही आमचा बहुमान समजतो.”इफकोने नेहमीच भारतीय शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य दिले आहे. त्यामुळे या परिषदेत भारतीय सहकारी संस्थांची उत्पादने आणि सेवांचे प्रदर्शन भारतातील गावांमधील ‘हाट’च्या संकल्पनेवर आधारित स्वरुपात असणार आहे.

Comments
Add Comment