Tuesday, July 1, 2025

Horoscope: २ डिसेंबरला होणार शुक्राचे गोचर, पुढील २ महिने या राशी कमावणार खूप पैसे

Horoscope: २ डिसेंबरला होणार शुक्राचे गोचर, पुढील २ महिने या राशी कमावणार खूप पैसे

मुंबई: २ डिसेंबरला शुक्र मकर राशीत सकाळी ११ वाजून ४६ मिनिटांनी गोचर करणार आहे. शु्क्राला प्रेम आणि सुंदरतेचा कारग्रह मानला जातो. ज्योतिषशास्त्रात शुक्राचे गोचर खूप खास मानले जाते. असे म्हणतात की शुक्राच्या कृपेमुळे त्या व्यक्तीला जीवनात मान-सन्मान, पैसा आणि आर्थिक लाभ मिळतो.


जाणून घ्या शुक्रच्या गोचरमुळे कोणत्या राशींना फायदा होत आहे.



मेष रास


शुक्रच्या गोचरमुळे मेष दहाव्या भावात जात आहे. करिअर प्रगतीपथावर राहील. अत्याधिक धनलाभ होईल. सोबतच नशिबाची साथ मिळेल. ही वेळ पैसा कमावण्यासाठी चांगली मानली जात आहे.



वृषभ रास


शुक्र वृषभ राशीच्या नवव्या भावात गोचर करत आहे. प्रत्येक कामात लाभ होतील. नव्या संधी प्राप्त होतील. खर्च नियंत्रणात राहील. लाभ आणि यश दोन्ही मिळतील.



कन्या रास


शुक्र कन्या राशीच्या पाचव्या भावात प्रवेश करतील. सर्व प्रयत्न यशस्वी ठरतील नोकरीत चांगली कामगिरी करू शकला. धनलाभाचे योग आहेत. नव्या लोकांशी ताळमेळ वाढेल.



तूळ रास


शुक्र तूळ राशीच्या चौथ्या भावात गोचर करतील. घर-कुटुंबाची साथ मिळेल. वरिष्ठ तुमच्या कामाचे कौतुक करतील. आर्थिक स्थिती चांगली राहणार आहे. आरोग्य चांगले राहील.

Comments
Add Comment