Monday, February 17, 2025
Homeताज्या घडामोडीJio पेक्षा BSNL वरचढ, तीन महिन्यांपासून खाजगी कंपन्यांना देतेय मात

Jio पेक्षा BSNL वरचढ, तीन महिन्यांपासून खाजगी कंपन्यांना देतेय मात

मुंबई: अनेक वर्षे भारतीय टेलिकॉम इंडस्ट्रीवर राज्य केल्यानंतर बीएसएनएल(BSNL) गेल्या एका दशकापासून खूप मागे पडले होते. त्यांचे सबस्क्रायबर्सही घटले होते. मात्र आता चित्र काही वेगळेच दिसत आहे. खासकरून प्रायव्हेट टेलिकॉम कंपन्यांनी आपल्या रिचार्जच्या किंमतीत वाढ केल्यानंतर या चित्रामध्ये फरक दिसत आहे.

या वर्षी जुलैमध्ये जिओ, एअरटेल आणि वोडाफोन या कंपन्यांनी आपले रिचार्ज प्लान्स महाग केले. तर जिओला सलग तिसऱ्या महिन्यात सबस्क्रायबर्सचे नुकसान उचलावे लागले. सप्टेंबर महिन्यात जिओच्या वायरलेस युजर्सची संख्या कमी झाली. तर एअरटेल आणि वोडाफोन आयडियाचेही नुकसान झाले.

या दरम्यान म्हणजेच सप्टेंबर २०२४मध्ये बीएसएनएलने नवे सबस्क्रायबर्स जोडले आहेत. ट्रायच्या रिपोर्टनुसार बीएसएनएल सबस्क्रायबर्सची संख्या जुलै महिन्यापासून सातत्याने वाढत आहे. जुलै महिन्यात कंपनीने २९.२ लाख, ऑगस्ट २५.३ लाख आणि सप्टेंबर महिन्यात ८.४ लाख नवे सबस्क्रायबर्स जोडले आहेत.

जिओचे सबस्क्रायबर्स आताही अधिक आहेत. कंपनीच्या एकूण सबस्क्रायबर्सची संख्या ४६.३७८ कोटी आहेत. एअरटेलजवळ ३८.३४८ कोटी आणि व्हीआयकडे २१.२४५ कोटी सबस्क्रायबर्स आहेत. तर बीएसएनएलच्या युजर्सची संख्या ९.३८ कोटी आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -