मुंबई : दर रविवारी रेल्वे प्रशासनाकडून (Railway Administration) रेल्वे दुरुस्तीची कामे करण्यासाठी मेगा ब्लॉक (Railway Megablock) घेण्यात येतो. मात्र सुट्टीच्या दिवशी बाहेर फिरायला जाणाऱ्या प्रवाशांचा खोळंबा होतो. त्यामुळे त्यामुळे रविवारी दिवसकालीन असणारा मेगाब्लॉम पश्चिम रेल्वेने (Western Railway) रद्द केला असून त्यादरम्यान उद्या उद्या तीन तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे रविवारी प्रवास करणाऱ्या प्रवाशांना काहीसा दिलासा मिळणार आहे.
Mumbai Local : मुंबईकरांच्या सेवेत दाखल होणार आणखी रेल्वे गाड्या!
मिळालेल्या माहितीनुसार, वसई रोड यार्डमध्ये सर्व गुड्स लाईन्समध्ये उद्या रात्री १२ वाजून १५ मिनिटं ते ३ वाजून १५ मिनिटांचा घेण्यात येणार आहे. यामध्ये सिग्नलिंग प्रणाली तसेच इतर आवश्यक देखभालीची कामे करण्यात येणार आहेत. (Railway Megablock)