Friday, February 14, 2025
Homeताज्या घडामोडी६४९९ रूपयांत लाँच झाला शानदार फोन, 5000mAh बॅटरी

६४९९ रूपयांत लाँच झाला शानदार फोन, 5000mAh बॅटरी

मुंबई: चीनची स्मार्टफोन कंपनी टेक्नोने भारतात नवा बजेट स्मार्टफोन लाँच केला आहे. याची किंमत खूप कमी आहे. या फोनमध्ये युजर्सला मोठी बॅटरी दमदार प्रोसेसर, शानदार कॅमेरा सेटअप आणि मोठी स्क्रीनही मिळणार आहे. तसेच या सर्व गोष्टींसाठी युजरला केवळ ६ हजार रूपये खर्च करावे लागतील.

डिस्प्ले आणि ऑडिओ फीचर्स

Tecno Pop 9 स्मार्टफोन अँड्रॉईड १४ ऑपरेटिंग सिस्टीमवर काम करतो. यात मीडियाटेक हेलिओ जी५० प्रोसेसर आहे. हा फोन ३ जीबी रॅम, व्हर्च्युअल रॅम आणि ६४ जीबी इंटरनल स्टोरेजसह येतो.

Tecno Pop 9मध्ये ६.६७ इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे. यात 90Hzचा रिफ्रेश रेट आहे. हा डिस्प्ले खूप स्मूथ आहे. खासकरून गेमिंग आणि व्हिडिओ स्ट्रीमिंगदरम्यान. यात डीटीएस सराऊंड साऊंडचा सपोर्टही आहे. यात ऑडिओ क्वालिटीही खूप चांगली असते.

या फोनमध्ये 5000mAh ची दमदार बॅटरी देण्यात आली आहे. कंपनीचा दावा आहे की ही बॅटरी फुल्ल चार्ज झाल्यानंतर १०० तासांपर्यंत म्युझिक प्लेबॅक टाईम देऊ शकते. कनेक्टिव्हिटीसाठी ड्युअल सिम स्लॉट, वायफाय, जीपीएस, ब्लूटूथ, ऑडिओ जॅक आणि यूएसबी टाईप सी पोर्ट आहे.

Tecno Pop 9 केवळ ३ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेजसह येतो. याची किंमत कंपनीने ६४९९ रूपये ठेवली आहे. या स्मार्टफोनची विक्री अॅमेझॉन इंडियावर २६ नोव्हेंबरपासून सुरू होईल. हा फोन तीन रंगात उपलब्ध आहे. Glittery White, Lime Green आणि Startrail Black मध्ये तुम्ही खरेदी करू शकता.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -