Sunday, May 11, 2025

मजेत मस्त तंदुरुस्तताज्या घडामोडी

विषापेक्षा कमी नाहीत आपल्या आसपास मिळणारे हे Fast Food, आरोग्याचे होईल नुकसान

विषापेक्षा कमी नाहीत आपल्या आसपास मिळणारे हे Fast Food, आरोग्याचे होईल नुकसान

मुंबई: हल्ली फास्टफूडचा जमाना आहे. गल्लोगल्ली सर्रासपणे सगळीकडेच फास्ट फूड मिळतात. लोकही हे पदार्थ चवीने खातात. फास्ट फूडमुळे(fast-food) तुमची ब्लड शुगर तसेच ब्लड प्रेशरवर परिणाम होऊ शकतो. शरीरावरील सूज वाढू शकते याचा अर्थ असा आहे की तुम्हाला पुरेसे पोषण मिळत नाही आहे. फास्टफूडमुळे पाचनशक्ती, सूज, हृदयविकार, तसेच लठ्ठपणाशी संबंधित समस्या होतात. फास्ट फूडमुळे हॉर्ट अॅटॅक, स्ट्रोक आणि अचानक कार्डियाक अरनेस्टचा धोका वाढू शकतो.


तुम्ही जर सतत पिझ्झा, बर्गर, फ्राईज, पॅक्ड चिप्स, रेड मीट, बेकन, हॉट डॉग्स आणि सॉसेज सारखे जंक आणि अल्ट्रा प्रोसेस्ड फूड खात असाल तर तुमच्यासाठी ही धोक्याची घंटा आहे. यामुळे स्मरणशक्तीवर परिणाम होतो.


करण्यात आलेल्या संशोधनानुसार अल्ट्रा प्रोसेस्ड फूडमुळे आपली स्मरणशक्ती कमकुवत होते तसेच स्ट्रोकचा धोकाही वाढतो. यामुळे मेंदूच्या आरोग्यावर मोठा परिणाम होतो. हे जंक फूड सातत्याने खात राहिले तर वय वाढण्यासोबतच मेंदूचे आरोग्यही बिघडते. यामुळे चांगल्या आहाराचे महत्त्व सगळ्यांना समजायलाच हवे.


दरम्यान, काही फास्ट फूड पदार्थ दुसऱ्यांच्या तुलनेत चांगले असतात. जर तुम्ही फास्टफूडचे सेवन कधीतरी करत असाल तर त्यामुळे काही होत नाही. तसेच ज्या पदार्थांमध्ये मीठ, फॅट, साखर आणि कार्बोहायड्रेटचे प्रमाण कमी असते ते पदार्थ तुम्ही खाऊ शकता.

Comments
Add Comment