Monday, February 10, 2025
Homeक्रीडाIPL 2025च्या आधी रजत पाटीदार बनला कर्णधार, RCBने दिल्या शुभेच्छा

IPL 2025च्या आधी रजत पाटीदार बनला कर्णधार, RCBने दिल्या शुभेच्छा

मुंबई: आयपीएल २०२५(IPL 2025) स्पर्धा जवळ येत चालली आहे. स्पर्धेच्या आधी मेगा लिलाव होणार आहे. यात अनेक खेळाडूंवर बोली लागणार आहे. मात्र त्याआधी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसाठी खेळणाऱ्या रजत पाटीदारला कर्णधार बनवल्याची बातमी समोर आली आहे. खुद्द आरसीबीने पाटीदारला कर्णदार बनल्याबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत.

खरंतर, रजत पाटीदारला सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी २०२४साठी मध्य प्रदेशचे कर्णधारपद देण्यात आले आहे. रजत मध्य प्रदेश संघाकडून फर्स्ट क्लास क्रिकेट खेळतो. शानदार कामगिरीमुळे त्याला मुश्ताक अली ट्रॉफीसाठी नेतृत्व सोपवण्यात आले आहे. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीची सुरूवात २३ नोव्हेंबरपासून होईल. तर स्पर्धेचा फायनल सामना १५ डिसेंबरला खेळवला जाईल.

आरसीबीने केले रिटेन

आयपीएल २०२४मध्ये शानदार प्रदर्शन करणाऱ्या रजत पाटीदारला आरसीबीने आयपीएल २०२४ साठी रिटेन केले आहे. रजतने आरसीबीसाठी २०२४च्या हंगामात १५ सामन्यांपैकी १३ डावांत ३०.३८च्या सरासरीने आणि १७७.१३च्या स्ट्राईक रेटने ३९५ धावा केल्या होत्या. यात ५ अर्धशतकांचा समावेश आहे.

आरसीबीकडून केवळ तीन खेळाडूंना रिटेन करण्यात आले. यात विराट कोहली, रजत पाटीदार आणि यश दयाल यांचा समावेश आहे. गेल्या हंगामात संघाचे नेतृत्व करणाऱ्या फाफ डू प्लेसिसला फ्रेंचायजीने रिलीज केले. अशातच आता २०२५ मध्ये आरसीबीचे नेतृत्व कोण करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -