Monday, February 17, 2025
Homeदेशपंतप्रधान नरेंद्र मोदींचा सन्मान, गयाना-डॉमिनिकाचे सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्कार

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सन्मान, गयाना-डॉमिनिकाचे सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्कार

नवी दिल्‍ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी(PM Narendra Modi) यांना गयानाचा ‘ऑर्डर ऑफ एक्सलन्स’, तसेच डॉमिनिकाचा ‘डॉमिनिका अवॉर्ड ऑफ ऑनर’ या दोन सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. पंतप्रधान मोदी गयाना आणि डॉमिनिका या दोन देशांच्या दौऱ्यावर होते.

गयानाच्या संसद सभागृहात आयोजित एका समारंभात गयानाचे अध्यक्ष डॉ.मोहम्मद इरफान अली यांनी पंतप्रधान मोदी यांचा ‘ऑर्डर ऑफ एक्सलन्स’ या सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरव केला. दूरदर्शी राजकीय नेतृत्व, जागतिक स्तरावर विकसनशील देशांच्या अधिकारांचा पुरस्कार, जागतिक समुदायाची असामान्य सेवा आणि भारत-गयाना संबंधांना बळकटी देण्याची वचनबद्धता याबद्दल पंतप्रधानांचा बहुमान करण्यात आला. पुरस्कार स्वीकारताना पंतप्रधान मोदींनी तो भारताच्या जनतेला आणि दोन्ही देशांमध्ये अतिशय खोलवर रुजलेल्या ऐतिहासिक संबंधांना समर्पित केला. आपला सरकारी दौरा म्हणजे भारत-गयाना मैत्रीला दृढ करण्याच्या दिशेने भारताच्या सातत्यपूर्ण बांधिलकीचा दाखला आहे, यावर त्यांनी भर दिला. गयानाचा सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त करणारे पंतप्रधान मोदी हे जगातील केवळ चौथे परदेशी नेते आहेत.

दरम्यान कॉमनवेल्थ ऑफ डॉमिनिकाच्या राष्ट्रपती सिल्व्हानी बर्टन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी((PM Narendra Modi) )यांना डॉमिनिकाचा सर्वोच्च राष्ट्रीय सन्मान “डॉमिनिका अवॉर्ड ऑफ ऑनर” प्रदान केला. हा सन्मान त्यांच्या उत्कृष्ट नेतृत्वासाठी, कोविड-19 महामारीच्या काळात डॉमिनिकाला केलेल्या मदतीसाठी आणि भारत-डॉमिनिका संबंध बळकट करण्याच्या त्यांच्या कटिबद्धतेसाठी दिला गेला. डॉमिनिकाचे पंतप्रधान रूझवेल्ट स्केरिट या कार्यक्रमाला उपस्थित होते. पंतप्रधानांनी हा सन्मान भारतातील जनतेला आणि भारत व डॉमिनिकामधील ऐतिहासिक व सांस्कृतिक संबंधांना समर्पित केला. तसेच, भारत आणि डॉमिनिकामधील द्विपक्षीय संबंध भविष्यात अधिक मजबूत होतील, असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -