Wednesday, May 7, 2025

महाराष्ट्रताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूज

CBSC बोर्डाकडून १०वी-१२वीचे वेळापत्रक जारी!

CBSC बोर्डाकडून १०वी-१२वीचे वेळापत्रक जारी!

'या' तारखेपासून सुरु होणार परीक्षा


मुंबई : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSC) २०२५ च्या इयत्ता दहावी आणि बारावी परीक्षेच्या तारखा जाहीर (SSC HSC Exam Timetable) करण्यात आल्या आहेत. याबाबतचे सीबीएसईच्या अधिकृत वेबसाइटवर वेळापत्रक जारी केले आहे. त्यानुसार यंदा १०वी व १२वी सीबीएससी बोर्डाच्या (CBSC Board) परीक्षा एकाच दिवशी सुरु होणार आहेत.


/>

मिळालेल्या माहितीनुसार, १५ फेब्रुवारी २०२५ पासून १०वी-१२वी सीबीएससी बोर्डाच्या परीक्षा होणार आहेत. १०वीच्या परीक्षा १५ फेब्रुवारी ते १ मार्च या कालावधीत होणार आहेत. तर बारावीच्या परीक्षा ४ एप्रिलला संपणार आहेत.


सीबीएसईने सांगितले की, "विद्यार्थ्याने निवडलेल्या कोणत्याही २ परीक्षा एकाच तारखेला होणार नाहीत याची खात्री करण्यासाठी ४० हजारांहून जास्त विषयांचे संयोजन टाळून तारीख पत्रक तयार केले गेले आहे. सीबीएसईने परीक्षा सुरू होण्याच्या सुमारे ८६ दिवस आधी वेळापत्रक जाहीर करण्याची ही पहिलीच वेळ आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा २३ दिवस आधीच वेळापत्रक जारी करण्यात आले आहे. (CBSC Board Exam)

Comments
Add Comment